Friday, May 24, 2024
Homeमुख्य बातम्याशिवसेनेत गळती सुरूच! आणखी काही आमदार नॉटरिचेबल

शिवसेनेत गळती सुरूच! आणखी काही आमदार नॉटरिचेबल

मुंबई | Mumbai

राज्यातील शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फुटलेल्या शिवसेना आमदारांना भावनिक साद घातली.

- Advertisement -

यानंतर देखील एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वाढता प्रतिसाद मिळताना दिसत आहे. माझ्यासोबत ४६ आमदार आहेत आणि आणखी १० आमदार येतील, असा दावा शिंदेंनी काल गुवाहाटीच्या विमानतळाबाहेर केला. त्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे नेते शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना धक्का बसला.

त्यातच आता सेनेचे आणखी सहा आमदार नॉट रिचेबल झाले आहेत. त्यातील काही जण गुवाहाटीला गेल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस सुरक्षेत हे आमदार हॉटेल रॅडिसन ब्ल्यूवर पोहोचले. त्यांच्या स्वागतासाठी शिंदे स्वत: हॉटेलच्या लॉबीत उभे होते. या आमदारांच्या कार्सच्या काचा काळ्या रंगाच्या होत्या. त्यामुळे त्यांचे चेहरे दिसू शकले नाहीत. मात्र या तीन आमदारांपैकी दोन जण मुंबईचे असल्याची माहिती मिळत आहे.

माहिमचे आमदार सदा सरवणकर आणि कुर्ल्याचे आमदार मंगेश कुडाळकर अशी त्यांची नावं आहेत. तसेच चांदिवलीचे आमदार दिलीप लांडे सेनेच्या संपर्कात नाहीत. राज्यमंत्री दादा भुसेदेखील नॉट रिचेबल आहेत. विशेष म्हणजे शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला लांडे आणि भुसे उपस्थित होते.

सावंतवाडीचे आमदार दिलीप केसरकर आणि यवतमाळच्या दिग्रसचे आमदार संजय राठोडदेखील नॉट रिचेबल होते. आपल्याला भाजपसोबत जावं लागेल, अशी भूमिका अनेक दिवसांपासून मी ठाकरे साहेबांकडे मांडतोय, असं केसरकर यांनी कालच माध्यमांनी सांगितलं होतं आणि आता ते नॉट रिचेबल झाले आहेत.

दरम्यान शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. मात्र, ते प्रत्यक्ष उपस्थित राहणार की ऑनलाइन उपस्थित राहणार आहेत, याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झाले नाही. या बैठकीत आता शिवसेना आता उरलेल्या आमदारांच्या बळावर कोणते डावपेच आखणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या