Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजEknath Khadse vs Girish Mahajan : "त्यांचे मानसिक संतुलन बिघडले, दिल्लीत जाऊन...

Eknath Khadse vs Girish Mahajan : “त्यांचे मानसिक संतुलन बिघडले, दिल्लीत जाऊन आमच्या नेत्यांच्या…”; महाजनांचा नाथाभाऊंवर प्रहार

जळगाव | Jalgaon

गेल्या काही दिवसांपासून राज्यात हनीट्रॅपचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणात जळगावच्या जामनेर तालुक्यातील प्रफुल्ल लोढा (Praful Lodha) यांचे नाव आले आहे. यावरून माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यात चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले आहे. त्यामुळे जळगावचे राजकारण ढवळून निघाले आहे.

- Advertisement -

गिरीश महाजन यांनी हनीट्रॅपचा संदर्भ देत, झाली ना त्याच्यावर कारवाई, एवढ्या कारवाया झाल्या, आता मी ऐकत होतो दोन-तीन गुन्हे कशावर असा वेगवेगळ्या ठिकाणच्या महिला आहेत. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईमध्ये (Mumbai) असेल पुण्यामध्ये असेल नाशिकमध्ये असेल कोणी महिलांनी (Women) तक्रार दिली असेल तर गुन्हे दाखल होईल तुम्हाला काय एवढे पोटसूळ उठले आहे, असा टोला खडसेंना लगावला.

YouTube video player

तसेच तुम्ही बोलणार नाही कारण त्यांचे मानसिक संतुलन खरेच बिघडलेले आहे. आता मी त्यांची मुलाखत (Interview) मोबाईलवर बघत होतो. ती कुणीतरी मला दाखवली. खरंच मला त्याची कीव येत आहे. मला खडसेंचा राग येत नाही पण कीव येते, असे वक्तव्य महाजनांनी केले.

दरम्यान, गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे या दोन नेत्यांचे विळा-भोपळ्याचे वैर सर्वांनाच माहिती आहे. खडसे भाजपमधून साईडलाईन झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. तर गेल्या वर्षी त्यांनी भाजपच्या (BJP) दिल्ली नेतृत्वाशी गाठीभेटी घेतल्या होत्या. माशी कुठं शिंकली ते कळले नाही पण भाजपात पुनरागमनाच्या खडसेंच्या चर्चाना विराम मिळाला. खडसे आणि महाजन एकमेकांना संधी मिळेल तसे डिवचतात. त्यामुळे आता महाजन आणि खडसे यांच्यातील वाद पुन्हा उफाळून येतांना दिसत आहे.

दिल्लीत जाऊन आडवे पडून पाया पडतात

एकनाथ खडसे म्हणतात मी काय केले? तुमचे ते भोसरी प्रकरण माहिती आहे. तुम्ही चोऱ्यामाऱ्या करता. डाके टाकता आणि वर दिल्लीत जाऊन आमच्या नेत्यांच्या अक्षरशः आडवे पडून पायावर पडतात. आणि त्यांच्याकडून सूट मिळवून देत आहे. म्हणून सगळा प्रकार चाललेला आहे. माफ करा, माफ करा, हा धंदा त्यांचा चाललेला आहे, असा टोला महाजनांनी खडसेंना लगावला, ते वायफळ बडबड करतात. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना इतके असह्य झालेले बघवत नाही. त्यामुळे त्यांच्यावर मी फार बोलणार नाही, असेही महाजन म्हणाले.

ताज्या बातम्या

जिल्हा परिषद, पंचायत समितीत स्वीकृत सदस्य?

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai महापालिका आणि नगरपालिकांप्रमाणेच आता जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्येही 'स्वीकृत सदस्य' नियुक्त केली जाण्याची शक्यता आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री...