Sunday, May 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRahuri Bypoll : भाजपच्या अक्षय कर्डिलेंविरोधात राहुरी पोटनिवडणुकीसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी उमेदवार देणार;...

Rahuri Bypoll : भाजपच्या अक्षय कर्डिलेंविरोधात राहुरी पोटनिवडणुकीसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी उमेदवार देणार; ‘या’ नेत्याचे नाव निश्चित!

मुंबई | Mumbai

राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. त्यानुसार या दोन्ही मतदारसंघात २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार असून, मतमोजणी ४ मे २०२६ रोजी केली जाणार आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर बारामती तर शिवाजी कर्डिलेंच्या निधनानंतर राहुरी मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. त्यानंतर आता भाजपकडून राहुरी मतदारसंघासाठी शिवाजी कर्डिलेंचे सुपुत्र अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) हे शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांचे भाचे असून, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते. त्यांनी भाजपच्या शिवाजी कर्डिले यांचा पराभव करत १,९७,३९२ मतांनी विजय मिळविला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे नगरविकास खात्याच्या राज्यमंत्रिपदाची धुरा सोपविण्यात आली होती. पुढे राष्ट्रवादी पक्षात फूट पडली, मात्र ते शरद पवारांसोबत राहिले. यानंतर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत तनपुरेंनी कर्डिलेंविरोधात राहुरीतून विधानसभा लढवली होती. पंरतु,त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

दरम्यान, आता भाजपकडून (BJP) शिवाजी कर्डिलेंच्या (Shivaji Kardile) मुलाला उमेदवारी देण्यात आल्यानंतर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्राजक्त तनपुरे यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे बोलले जाते. मात्र, ते राहुरीतून अपक्ष रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जर तनपुरे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली तर ही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे. लोकप्रतिनिधीच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागल्यावर त्याच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी दिली गेल्यास निवडणूक बिनविरोध करण्याची राजकीय परंपरा महाराष्ट्रात होती. मात्र, गेल्या काही काळापासून या परंपरेला छेद दिल्याचे चित्र काही ठिकाणी बघायला मिळत आहे.

राहुरी विधानसभा मतदारसंघाचा इतिहास

राहुरी विधानसभा मतदारसंघातून १९८० ते १९९९ दरम्यान प्रसाद बाबूराव तनपुरे हे पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. यात चार वेळा काँग्रेसच्या तिकिटावर आणि एक वेळा अपक्ष म्हणून त्यांचा विजय झाला होता. तर २००९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपच्या शिवाजी कर्डिले यांनी प्रसाद तनपुरे यांचा पराभव केला होता. कर्डिले यांना ५७ हजार ३८० तर तनपुरे यांना ४९ हजार ०४७ इतकी मते मिळाली होती. याशिवाय २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवाजी कर्डिले यांना ९१ हजार ४५४ इतकी मते मिळाली होती.त्यावेळी त्यांच्या विजयाचे अंतर २५ हजार ६७६ एवढ्या मतांचे होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राजक्त तनपुरे यांनी १ लाख ०९ हजार २३४ एकूण मते मिळवत शिवाजी कर्डिले यांचा २३ हजार ३२६ मतांनी पराभव केला होता. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवाजी कर्डिले यांना १ लाख ३४ हजार ८८९ तर प्राजक्त तनपुरे यांना ०१ लाख १४४ इतकी मते मिळाली होती. त्यावेळी अवघ्या थोड्या मतांच्या फरकाने कर्डिले विजयी झाले होते.

असा आहे पोटनिवडणूकीचा कार्यक्रम

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख – ०६ एप्रिल २०२६
दाखल झालेल्या अर्जांची छाननी – ०७ एप्रिल २०२६
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – ०९ एप्रिल २०२६
मतदानाची तारीख – २३ एप्रिल २०२६
मतमोजणीची तारीख – ०४ मे २०२६
निवडणूक प्रक्रिया पूर्ण – ०६ मे २०२६

ताज्या बातम्या

Shirdi : नीता अंबानींनी घेतले साईदर्शन

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi जागतिक ख्यातीचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील श्री साईबाबांच्या दरबारी शनिवारी रात्री रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता मुकेश अंबानी (Nita Ambani) यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन...