Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRaj Thackeray : उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे 'मातोश्री'वर; राजकीय...

Raj Thackeray : उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे ‘मातोश्री’वर; राजकीय युती होणार?

मुंबई | Mumbai

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा आज (रविवार) ६५ वा वाढदिवस आहे. त्यानिमिताने आज उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातील शिवसैनिक दाखल झाले आहेत. त्यातच आता मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे देखील उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्री निवासस्थानावर दाखल झाले आहेत. त्यामुळे या दोघा भावांत काही राजकीय चर्चा होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहेत.

- Advertisement -

राज ठाकरे (Raj Thackeray) हे मातोश्रीवर जाणे हा अनेक अर्थांनी ऐतिहासिक क्षण मानला जात आहे. शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे हे काही निवडक प्रसंग सोडले तर मातोश्रीवर (Matoshree) गेले नव्हते. राज ठाकरे हे जेव्हा जेव्हा मातोश्रीवर गेले होते, तेव्हा काहीतरी कारण होते. मात्र, आता राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पहिल्यांदाच स्वखुशीने मातोश्रीवर पोहोचले.

YouTube video player

राज ठाकरे यांनी मातोश्रीवर पोहोचताच त्यांनी पहिल्यांदा भावाच्या हातात हात दिला आणि वाढदिवसाच्या (Birthday) शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन हातात हात दिला. तर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या खाद्यांवर हात ठेवून आलिंगन दिले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी सजंय राऊत, अंबादास दानवे हे मातोश्रीच्या गेटवर आले होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मराठी विजयी मेळाव्याच्या निमित्ताने राज आणि उद्धव ठाकरे हे तब्बल १९ वर्षांनंतर एका व्यासपीठावर एकत्र आले होते. त्यानंतर आता वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर गेल्याने ठाकरे बंधूंच्या मनोमिनलाची प्रक्रिया आणखी पुढे सरकल्याचे दिसत आहे. तसेच या भेटीमुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे.

ताज्या बातम्या

Soybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला (Soybeans) 5500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनच्या 37 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला...