मुंबई | Mumbai
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे सरकार पाडले, बेईमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होते, असे म्हणत शरद पवारांवर (Sharad Pawar) आज माध्यमांशी बोलतांना हल्लाबोल केला आहे. यावरून महाविकास आघाडी वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला (Chandrashekhar Bawankule) मिळत असून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने देखील संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे.
राज्यात संजय राऊतांच्या विधानावरून मविआत वादंग उठले असताना दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर (MLA Uttam Jankar) यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आमदार उत्तम जानकर यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची देखील मंत्रालयात भेट घेतली. जानकर हे माळशिरस मतदारसंघातून विजयी झाले आहेत. मात्र, त्यांनी मारकरवाडी गावातून झालेल्या मतदानावर आक्षेप घेत ईव्हीएम मतदानावर आक्षेप नोंदवण्यास सुरुवात केली आहे.
त्यामुळे ईव्हीएमविरोधातील (EVM) आंदोलनात सहभागी होण्यासाठी जानकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर (MLA Uttam Jankar) यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, निवडणूक आयोगाने बॅलेटवर निवडणूक घेण्याची तयारी दर्शवल्यानंतर आपण राजीनामा देणार असल्याचे त्यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता ईव्हीएमविरोधात पुन्हा एकदा राज्यात रान उठण्याची शक्यता आहे.