Wednesday, September 30, 2026
Homeमुख्य बातम्याAjit Pawar : "दम द्यायचा बंद करा, तुमच्याकडे असणारे व्हिडिओ अन् पेन...

Ajit Pawar : “दम द्यायचा बंद करा, तुमच्याकडे असणारे व्हिडिओ अन् पेन ड्राईव्ह…”; अजित पवारांचे हनीट्रॅपवरून विरोधकांना आव्हान

मुंबई | Mumbai

राज्यात गेल्या काही दिवसांपासून हनीट्रॅपचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणात काही आजी-माजी मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ७२ जण अडकल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या हनीट्रॅप (Honey Trap) प्रकरणी चौकशी सुरु असून, या प्रकरणात विरोधकांकडून दररोज वेगवेगळे खुलासे केले जात आहेत. दुसरीकडे विधानसभा अधिवेशनामध्ये देखील हनीट्रॅपवरून बरीच चर्चा झाली.

- Advertisement -

मात्र सरकारकडून दावा सातत्याने फेटाळण्यात येत आहे. अधिवेशनात काँग्रेस आमदार नाना पटोले (Nana Patole) यांनी पेनड्राईव्ह असल्याचे सांगत सरकारची झोप उडवून दिली होती. या सर्व पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य करत विरोधकांना जाहीर आव्हान दिले आहे.

यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले की, “एकदाच सांगतो दम द्यायचा बंद करा, तुमच्याकडे व्हिडिओ असेल पेन ड्राईव्ह असेल, तर बाहेर काढा आणि ते लोकांसमोर येऊ द्या. काहीही बातम्या लावायच्या त्यापेक्षा कुणाकडे काय व्हिडीओ आहे, कुणाकडे काय पेनड्राईव्ह आहे , कुणाकडे आणखी हनीट्रॅपची सीडी आहे ते सगळ्यांना एकदा कळू द्या” असे त्यांनी म्हटले.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, “माध्यमांनी (Media) या प्रकरणात चार मंत्री आहेत. आयपीएस, आएएएस ऑफिसर आहेत. यात बरेच काही राजकीय लोक आहेत ,असं दाखवल्यावर सगळ्या मंत्र्यांकडे व अधिकाऱ्यांकडे त्यादृष्टीने पाहण्यास सुरुवात होते.त्यामुळे मला असं वाटतं की काय वस्तुस्थिती आहे, ती एकदाची समोर येऊ द्या असंही अजित पवार यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अर्ज खरेदीला इच्छुकांच्या उड्या

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांकडून प्रयत्न सुरू असतानाच उमेदवारी अर्ज खरेदीसाठी इच्छुकांची झुंबड उडाली आहे. उमेदवारी अर्ज विक्रीच्या...