Wednesday, April 9, 2025
Homeमुख्य बातम्याMaharashtra Politics : "...तर थेट मंत्रिपद"; राष्ट्रवादीच्या बैठकीत कृषिमंत्री कोकाटेंना अजित पवारांनी...

Maharashtra Politics : “…तर थेट मंत्रिपद”; राष्ट्रवादीच्या बैठकीत कृषिमंत्री कोकाटेंना अजित पवारांनी सुनावल्याची चर्चा, नेमकं काय म्हणाले?

मुंबई | Mumbai

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) हे त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे काहीसे अडचणीत आले आहेत. त्यांनी महिनाभरापूर्वी अमरावती दौऱ्यावर (Amravati Visit) असताना शेतकऱ्यांबाबत (Farmer) बोलतांना ‘हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही. आम्ही तर एक रुपयात पीकविमा देतो, असे विधान केले होते.त्यावरून राज्यात कोकाटे यांच्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. यानंतर आता पुन्हा एकदा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी बोलतांना वादग्रस्त विधान केले आहे.

- Advertisement -

यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंत्री कोकाटेंना सुनावल्याची माहिती समोर आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रणनीती ठरविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारयांच्या देवगिरी या शासकिय निवासस्थानी मंगळवारी (दि.०८) रोजी सर्व आमदारांची बैठक पार पडली. यावेळी अजित पवारांनी मंत्री कोकाटेंना सातत्याने होणाऱ्या वादग्रस्त विधानांवरून झापल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांनी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना (Ministers) एकदा दोनदा चूक झाली, तर समजून घेऊ. मात्र, तिसऱ्या वेळी चूक झाली तर माफी नाही थेट मंत्रिपद बदलू असा सज्जड दम अजित पवारांनी या बैठकीत दिल्याचे बोलले जात आहे. तसेच मंत्री कोकाटेंना सातत्याने माध्यमांमध्ये पक्षाला अडचणीची ठरणारी वक्तव्य करणे, जनता दरबारला पक्ष कार्यालयात हजर न राहणे यावरून अजित पवारांनी झापल्याचे सांगितले जाते.

कोकाटे नेमकं काय म्हणाले?

काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यावेळी बोलतांना कोकाटे यांनी ‘जे नियमितपणे कर्ज भरतात त्यांनी भरावे. कर्ज घ्यायचे आणि पाच ते दहा वर्षे कर्जमाफी होण्याची वाट पाहायची. तोपर्यंत काही भरायचे नाही. कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात. त्या पैशांचे तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक आहे का? तुम्हाला पाईपलाईनाला पैसे आहेत. सिंचनासाठी आहेत. शेततळ्यासाठीही आहेत. सरकार भांडवली गुंतवणूक करते. भांडवली गुंतवणूक शेतकरी करतात का? शेतकरी म्हणतात की, पीकविम्याचे पैसे पाहिजेत, याचे पैसे पाहिजे. मग साखरपुडे करा, लग्न करा, असे म्हणत वादग्रस्त विधान केले होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Supriya Sule : “…तोपर्यंत मी अन्नत्याग करेन”; भर उन्हात सुप्रिया सुळेंचं...

0
पुणे । Pune राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. गेल्या तीन तासांपासून त्या...