Thursday, April 16, 2026
Homeमुख्य बातम्याNavneet Rana : किसी के हात ना आयेगी…; माजी खासदार नवनीत राणांचा...

Navneet Rana : किसी के हात ना आयेगी…; माजी खासदार नवनीत राणांचा भरपावसात डान्स, Video व्हायरल

मुंबई | Mumbai

भाजप नेत्या आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) या नेहमी वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतात. कधी क्रिकेटच्या मैदानावर बॅट घेऊन तर कधी आदिवासी नृत्यावर नवनीत राणा ठेका धरताना दिसतात. त्यांची ही कृती लक्ष वेधून घेणारी असते. अशातच आता नवनीत राणा यांचा पावसाचा (Rain) आनंद लुटतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

नवनीत राणा यांच्या हातात (Hand) या व्हिडीओत (Video) छत्री दिसत असून त्या एका हिंदी गाण्यावर (Hindi Song) नाचताना पाहायला मिळत आहे. किसी के हात ना आयेगी ये लडकी असे म्हणत नवनीत राणा डान्स (Dance) करत आहे. या गाण्यातून त्यांना काही संदेश द्यायचा आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, नवनीत राणा यांचा व्हायरल (Viral) होत असलेला व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे याबाबतची नेमकी माहिती उपलब्ध नाही. मात्र, नवनीत राणा यांच्या या डान्स व्हिडिओमुळे सोशल मीडियावर (Social Media) जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हा व्हिडिओ अल्पावधीतच हजारो लोकांनी पाहिला असून, त्यावर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी केला लोकसभेत राणांचा पराभव

२०२४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी १९,७३१ मतांनी पराभव केला. राणा यांना ५,०६,५४० तर वानखेडे यांना ५,२६,२७१ मते मिळाली होती.

ताज्या बातम्या

रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु असताना दुर्दैवी घटना; टँकरच्या धडकेत महिलेचा मृत्यू

0
ओझे l वार्ताहर Oze नाशिक-अकराळे फाटा रस्त्याचे रुंदीकरण काम सुरू असताना आज सायंकाळी ढकांबे टोल नाक्याजवळ दुर्दैवी अपघात घडला. रस्त्यावर पाणी मारणाऱ्या टँकरने दिलेल्या धडकेत...