Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Politics : भाजपचे राज्यात पुन्हा 'ऑपरेशन लोट्स'

Maharashtra Politics : भाजपचे राज्यात पुन्हा ‘ऑपरेशन लोट्स’

भाजप नेत्याचा दुजोरा, महाविकास आघाडीचे खासदार फुटणार?

मुंबई | Mumbai

भाजप (BJP) महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) लवकरच मोठा धक्का देण्याची शक्यता असून महाविकास आघाडीतील काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची बोलले जात आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) महाराष्ट्रात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. या निवडणूक निकालानंतर राज्यात भाजपच्या नेतृत्त्वातील महायुतीचा आत्मविश्वास कमालीचा दुणावला आहे.तर महाविकास आघाडीला पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा भाजप (BJP) मविआला धक्का देण्याची शक्यता असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार संपर्कात असल्याची माहिती भाजपच्या गोटातून समोर आली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीत मविआचा दारूण परभव झाल्याने काही खासदारांनी (MP) आत्मविश्वास गमावला आहे. त्यामुळे लवकरच महाविकास आघाडीतील काही खासदार राजीनामा (Resignation) देण्याची शक्यता असून हे खासदार राजीनामा देऊन पुन्हा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे भाजपकडून राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन लोट्स राबविले जाणार असल्याच्या चर्चा आहेत.याचा परिणाम केंद्रातील समीकरणावर होणार आहे.

तसेच ऑपरेशन लोट्सच्या वृत्ताला भाजप आमदार प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनीही दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, महाविकास आघाडीमधील खासदार आणि आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. महाविकास आघाडीचे खासदार ज्या ठिकाणी आहेत, विशेषत: शरद पवारांच्या पक्षाचे खासदार जिथे आहेत तिथे महायुतीचे आमदार निवडून आले आहेत. त्याचबरोबर विकास हाही त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. जर आपले राजकीय भविष्य नीट व्हावे असं त्यांना वाटत असेल. ज्यासाठी निवडणूक लढवतो तो विकास अशी मानसिकता असेल तर यासाठी शरद पवारांचे खासदार अशी भूमिका घेऊ शकतात. आपल्याला विकास हवा असेल तर सत्तेच्या माध्यमातून गतीनं विकास करता येतो. केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे भक्कम सरकार दोन्ही ठिकाणी आहे. त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) भाजपला राज्यात मोठा धक्का बसला होता. या निवडणुकीत भाजपने २८ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी फक्त ९ जागांवर त्यांना विजय मिळाला. तर महायुतीला (Mahayuti) राज्यात १७ जागांवर विजय मिळाला.तसेच महाविकास आघाडीला ३० जागांवर विजय मिळाला. तर, एका जागी अपक्ष उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांचा विजय झाला. यानंतर त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...