Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Politics : महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी; मंत्र्यांची संभाव्य यादी समोर

Maharashtra Politics : महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी; मंत्र्यांची संभाव्य यादी समोर

नाशिक, अहिल्यानगरमधून कुणाला लॉटरी?

मुंबई | Mumbai

महायुती सरकारचा रविवार (दि.१५ डिसेंबर) रोजी नागपूरमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. १९९१ नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी (Maharashtra Cabinet Expansion) पार पडणार आहे. उद्या दुपारी ४ वाजता हा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देणार आहेत. त्यामुळे या मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे २२, शिवसेनेचे १२ आणि राष्ट्रवादीचे १० आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे समोर आले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) स्वतः संभाव्य मंत्र्यांना फोन करणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना फोन करून उपस्थित राहण्याच्या सूचना करणार असल्याचे बोलले जात आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात सागर बंगल्यावर बैठक पार पडली.या दोघांमध्ये खाते वाटपाबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्व:ताकडे गृह खाते आणि भाजपमधील एखाद्या आमदाराला अर्थखाते देऊ शकतात. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगरविकास आणि महसूल खाते देण्यात येणार आहे. यामध्ये एकनाथ शिंदे हे महसूल खातं इतर कोणालाही देऊ शकतात. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग ही खाती दिली जाणार आहेत, असे सांगितले जात आहे.

दरम्यान, जुन्या मंत्रिमंडळातील गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या जबाबदारीत पक्षवाढीसाठी बदल करण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांनी घेतल्याचे समजते. गिरीश महाजन यांच्याकडे भाजप प्रदेशाध्यक्षपदाची, तर रवींद्र चव्हाण यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी देण्यात येणार आहे. रात्री उशिरापर्यंत या दोघांचा मंत्रिमंडळात समावेश व्हावा, म्हणून भाजप नेतृत्व दिल्लीतील शीर्षस्थ नेत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे महाजन आणि चव्हाण यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार की नाही याबाबत? अद्यापही संभ्रम आहे. मात्र, तरीही त्यांचे संभाव्य मंत्रिमंडळात नाव आहे.

संभाव्य मंत्र्यांची यादी खालीलप्रमाणे

भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी

गिरीश महाजन, रविंद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, नितेश राणे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, राहुल कुल, माधुरी मिसाळ, संजय कुटे, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकर देवयानी फरांदे किंवा राहुल आहेर

शिवसेना शिंदे गटाची संभाव्य मंत्र्यांची यादी

उदय सामंत, शंभूराजे देसाई, गुलाबराव पाटील, दादा भुसे,प्रताप सरनाईक, संजय शिरसाठ, भरत गोगावले आशिष जयस्वाल, योगेश कदम, विजय शिवतारे, आबिटकर किंवा यड्रावकर

अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी

छगन भुजबळ, आदिती तटकरे, अनिल पाटील, संजय बनसोडे,मकरंद पाटील, नरहरी झिरवाळ, धनंजय मुंडे सना मलिक, इंद्रनील नाईक

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...