मुंबई | Mumbai
राज्याचे महसूलमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पक्षाच्या बैठकीत बोलताना कार्यकर्त्यांना ‘काँग्रेसला (Congress) फोडा आणि पक्ष रिकामा करा’, असा कानमंत्र दिला आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.पुण्यात भाजपची कार्यकर्ता संवाद बैठक प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडली. या कार्यक्रमात बोलतांना त्यांनी वरील विधान केले आहे.
यावेळी बावनकुळे म्हणाले की, “अलीकडेच काँग्रेसचे भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांनी भाजपात (BJP) पक्षप्रवेश केला. यावरून भाजप पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पक्षाच्या बैठकीत बोलतांना बावनकुळे यांनी ‘काँग्रेसला (Congress) फोडा आणि पक्ष रिकामा करा’. काँग्रेसचे लोक आपल्याकडे आले तरी निवडणुकीत तिकीट देताना तुमचा आधी विचार करण्यात येईल”, असे आश्वासन त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.
तसेच चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विधानावर स्पष्टीकरण देतांना माध्यमांशी बोलतांना म्हणाले की, “काँग्रेस नेत्यांना त्यांचा पक्ष सांभाळता येत नाही त्याला मी काय करणार. काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना (Worker) त्यांच्या नेत्यांकडून काहीच अपेक्षा नाही”, असे म्हटले होते. मात्र, बावनकुळेंच्या विधानावरून भाजपची काँग्रेसच्या नेत्यांवर नजर असल्याचे दिसून येत आहे.
पुढे ते म्हणाले की, “विरोधकांमध्ये स्वतःची पार्टी वाढवण्याची क्षमता आता राहिली नाही. काँग्रेस पार्टीमध्ये काही शिल्लक राहिले नाही. शरद पवार (Sharad Pawar) साहेबांकडे कोणी जायला तयार नाही, उद्धव ठाकरेंचे शिवबंधन तर सगळे विसरून गेले आहेत. त्यांना त्यांची पार्टी संभाळता येत नाही तर आम्ही काय करावं? उद्धवसेनेचे लोक आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत आणि आम्हाला सांगतात की, उद्धव ठाकरेंनी वक्फ बोर्डाच्या विधेयकाला विरोध केला म्हणून आम्ही तुमच्या पक्षात येत आहोत. आता आम्ही काय करायला हवे?’ असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.