Tuesday, March 11, 2025
Homeब्रेकिंग न्यूजChhagan Bhujbal : "कसला वादा अन् कसला..."; भुजबळांचा अजित पवारांवर निशाणा

Chhagan Bhujbal : “कसला वादा अन् कसला…”; भुजबळांचा अजित पवारांवर निशाणा

नाशिक | Nashik

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) रविवार (दि.१५) रोजी पार पडला. यात एकूण ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामध्ये भाजपच्या १९, शिवसेनेच्या (शिंदे गट) ११ आणि राष्ट्रवादीच्या (९) आमदारांचा समावेश होता. या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना संधी मिळणार अशी चर्चा असतानाच त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले. त्यामुळे छगन भुजबळ नाराज झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी आज आपल्या नाशिकच्या निवासस्थानी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर भुजबळ हे आपल्या येवला मतदारसंघात गेले असता त्यांनी त्याठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

- Advertisement -

यावेळी भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, “येवला-लासलगाव मतदारसंघातील सर्व मतदारांचे मनःपूर्वक आभार मानतो, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपण हा किल्ला लढवला. भुजबळ साहेब निवडून येणार नाहीत, असे आमच्या राष्ट्रवादीत बोलणे चालले होते. मात्र, मतदारसंघातील सर्व जाती धर्माचे लोक माझ्यासोबत होते. या निवडणुकीत मी मोठ्या संख्येने निवडून आलो. देशात जो प्रयोग झाला नाही तो प्रयोग आपण येवल्यात केला. १६० किलोमीटर लांबून पाणी आणले. पाण्याचा हा प्रकल्प अजून पूर्ण झालेला नाही. तो पूर्ण करायचा आहे. ज्यांनी मते दिली नाही त्यांनाही अजून जास्त पाणी द्यायचे आहे, तालुक्याच्या विकासासाठी सगळ्यांना सोबत घ्यायचे आहे. सर्वांनी एकत्रित काम करून नगरपरिषद, जिल्हा परिषद,पंचायत समिती या निवडणुकांत आपली ताकद दाखवून द्यायची आहे”, असे त्यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, “काही लोकांनी अजित पवारांना मला मंत्री केले नाही म्हणून धन्यवाद दिले.मात्र, मला मंत्रिपद भेटले काय आणि नाही भेटले काय यात काही वाद नाही. पहिल्यांदा मी महसूल मंत्री झालो आता त्यावरून पक्षांमध्ये भांडणं सुरू आहेत. विरोधी पक्षनेता झालो त्यावेळी पवारांच्या अपेक्षेपेक्षा जास्त काम केले. १९९९ साली जर काँग्रेस एकत्र असती तर मी १०० टक्के मुख्यमंत्री झालो असतो, मला सोनिया गांधींपासून अनेकांचे फोन होते की तुम्ही काँग्रेस सोडू नका तुम्हाला मुख्यमंत्री करणार आहोत. पण मी शरद पवारांसोबत गेलो. राष्ट्रवादी स्थापन झाली तेव्हा कोणाचा पत्ता नव्हता फक्त मी आणि शरद पवार साहेब होतो. जेव्हा मुंबईत दहशत होती तेव्हा मी गृहमंत्री झालो. बच्चन, शाहरुख मुंबई सोडून जाणार होते, मी त्यांना थांबवले आणि मुंबईतील दहशत संपवली”, असे छगन भुजबळांनी सांगितले.

भुजबळ पुढे म्हणाले की, “होळीच्या दिवशी मला रस्त्यातून अजितदादांनी बोलावून घेतलं आणि मला लोकसभा लढवायला सांगितले. तेव्हा मी म्हटले लोकसभा लढणार नाही, मग त्यावेळी अजितदादांनी पुढे येऊन लगेच सांगायला पाहिजे होत ना, मी काय दूध पितो का? मी काही लहान बाळ आहे का? मला समजत नाही का? साताऱ्याची जागा आम्ही भाजपला सोडली म्हणून एक राज्यसभा आम्हाला मिळाली होती अजितदादांनी शब्द दिला म्हणजे काय? काही चर्चा आहे की नाही. त्यानंतर आठ दिवसांपूर्वी समीर भुजबळांना पटेल, तटकरे यांनी बोलवले. नितीन पाटील यांचा राजीनामा घेऊन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवू, असे सांगितले. मकरंद पाटील यास मंत्रिपद द्यायचे अन् त्याच्या भावाला खाली बोलवायचे. हा काय पोरखेळ आहे का? लोकांनी मला निवडून दिले, त्यांना मी काय तोंड देवू. त्यांना भुजबळांचा बळी घ्यायचा होता का? छगन भुजबळ काय लल्लू पाटील आहे का? हा काही पोरखेळ आहे का? माझ्या मनात मंत्री पदाची शंका होती, आणि त्याप्रमाणेच झाले. माझी जर किंमत होत नसेल तर काय उपयोग? दादाचा वादा.वाह रे दादाचा वादा, कसला वादा, अन् कसला दादा, असे म्हणत छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

निर्णय फक्त तिघांमध्ये होतो

नाशिकला आपल्याला कार्यकर्त्यांनी सांगितले आहे, आपण जो निर्णय घेऊ तो मान्य असेल. आपण मंत्रिपद मिळालं म्हणून नाराज नाही,तर पक्षात मिळत अपल्याला चांगली वागणूक मिळत नाही. पक्षात फक्त तीन लोकांमध्ये म्हणजेच अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात निर्णय होतो. विशेष म्हणजे स्वतः फडणवीस आणि बावनकुळे हे मंत्री मंडळात माझे नाव घेण्यासाठी आग्रह होते. मात्र, काही लोकांना शब्द दिला म्हणून माझ्यावर अन्याय झाला, असेही भुजबळ म्हणाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : नाशिक कृउबा समितीचे सभापती देविदास पिंगळेंविरुद्ध अविश्वास ठराव...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Nashik नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Nashik APMC) सभापती देविदास पिंगळे (Devidas Pingale) हे बाजार समितीत मनमानी व हुकूमशाही पद्धतीने कामकाज...