Thursday, May 15, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Politics : महायुती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्र लढणार का? CM...

Maharashtra Politics : महायुती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्र लढणार का? CM फडणवीसांनी केले मोठे विधान, म्हणाले…

पुणे | Pune 

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार माहिन्यात घ्या, असे आदेश दिले होते. न्यायालयाच्या (Supreme Court) या आदेशानंतर राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (MVA) निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. अशातच आता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्र लढणार की नाही? याबाबत मोठे विधान केले आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलतांना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, “आम्ही तिन्ही पक्ष एकत्र असून, महायुती (Mahayuti) म्हणूनच आम्ही निवडणुका (Election) लढवू. मात्र, काही अपवादात्मक ठिकाणी तुल्यबळ उमेदवार असतील तर समजुतीने वेगळे लढू. पण युती होणार नाही, त्या ठिकाणी वेगळं लढू. एकमेकांवर टीका न करता सकारात्मक प्रचार करू, असे त्यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, “महापालिका निवडणुका (NMC Election) वेळेत घेण्यासाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. ज्या भागात पावसाचा प्रभाव जास्त आहे, तिथे गरज भासल्यास १५ दिवसांची मुदतवाढ मागितली जाऊ शकते”, असेही फडणवीस म्हणाले. तसेच ‘आमच्यात (महायुती) अंडरस्टँडिंग आहे. वेगळे जरी लढलो तरी आम्ही ‘पोस्ट पोल’ नंतर एकत्र येणारच’, असं देखील त्यांनी म्हटले.

दरम्यान, महाराष्ट्रात युती सरकार (Yuti Government) आल्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रशासकीय सुधार आला पाहिजे. प्रशासकीय क्षमता वाढली पाहिजे म्हणून विविध अधिकारी यांची कार्यशाळा आणि संवाद करत आहोत. आज महापालिका आयुक्त, सीइओ यांची कार्यशाळा पार पडणार आहे. त्यांचे आम्ही गट तयार करत असून, त्यांच्याशी एक तास चर्चा करून त्यांच्या अडचणी आणि विचार याबाबत चर्चा करीत आहोत, असेही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

डोनाल्ड

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा Apple चे CEO टिम कुकनां सल्ला:...

0
मुंबई | Mumbai अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भारताबद्दल कतार येथील दोहा येथून मोठे विधान केले आहे. यामध्ये ट्रम्प यांनी Apple चे सीईओ टिम कूक...