Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis : "आमची ही भेट..."; राज ठाकरेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis : “आमची ही भेट…”; राज ठाकरेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई | Mumbai

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास सव्वा तास चर्चा झाली. या भेटीनंतर दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याची माहिती समोर आलेली नव्हती. त्यानंतर आता या भेटीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,”आमची ही भेट कुठलीही राजकीय नव्हती. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंचा मला अभिनंदनाचा फोन आला होता. त्यावेळस मी त्यांना सांगितलं होतं की मी घरी येईल त्याप्रमाणे मी आज घरी गेलो होतो. यावेळी नाश्ता केला, गप्पा मारल्या. मात्र, या बैठकीच्या किंवा गप्पांचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही. केवळ एक जी मैत्री आहे त्या मैत्रीकरता मी त्यांच्या घरी गेलो होतो, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईत (Mumbai) झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला होता. तसेच अजित पवारांचे मोठ्या संख्येने आमदार (MLA) निवडून येण्यावर त्यांनी शंकाही उपस्थित केली. त्याचप्रमाणे भाजपवरही त्यांनी निशाणा साधला होता. त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

मनसे नेते अमित ठाकरे आमदार होणार?

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीत भाजपच्या (BJP) कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदाराची (MLA) मनसेला (MNS) ऑफर दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) विधानपरिषदेचे आमदार होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी ६ जागांवरील नियुक्ती विधानसभा निवडणुकीआधी करण्यात आली होती. तर अजूनही उर्वरीत ६ जागा रिक्त आहेत. त्यामुळे अमित ठाकरे यांना विधानपरिषदेवर संधी देऊन राज यांच्यासोबत राजकीय युतीसाठी हात पुढे करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे आजच्या भेटीतून दिसत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...