Saturday, April 5, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Politics : माणिकराव कोकाटेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन...

Maharashtra Politics : माणिकराव कोकाटेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

एक रुपया पीक विमा योजनेवरून शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे (Minister Manikrao Kokate) यांनी सरकारकडून मिळणाऱ्या निधीचा उपयोग शेतीऐवजी साखरपुडे, लग्नासाठी करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांवर लावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करणाऱ्या कोकाटेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी केली.

- Advertisement -

नाशिकमध्ये (Nashik) अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rains) झालेल्या नुकसानीची पाहणी माणिकराव कोकाटे यांनी पाहणी केली होती. यावेळी कोकाटेंनी शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेताना, शेतकऱ्यांकडून (Farmer) शासकीय मदतीच्या निधीचा उपयोग शेतीत करण्याऐवजी वैयक्तिक खर्चासाठी होत असल्याची टीका केली. या टीकेचा सपकाळ यांनी आज पत्रकार परिषदेत समाचार घेतला.

सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन महायुतीने (Mahayuti) दिले होते. ते अद्याप पाळलेले नाही. आता कर्जमाफीसाठी पैसे नाहीत असे सरकार म्हणते. अशातच कर्जमाफीवरून कृषी मंत्र्यांचा शेतकऱ्यांना प्रश्न म्हणजे ‘चोर तो चोर आणि वरून शिरजोर’ असा प्रकार आहे. शेतकऱ्याला सरकार मदत करते किंवा कर्जमाफी करते म्हणजे काही उपकार करत नाही. तो जनतेचा पैसा आहे, कोकाटेंच्या घरचा नाही, असे सपकाळ यांनी यावेळी सुनावले.

राज्यातील भाजप (BJP) महायुतीचे सरकार (Mahayuti Government) हे शेतकरीविरोधी आहे. माणिकराव कोकाटे यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. मूठभर उद्योगपतींना १६ लाख कोटींचे कर्ज माफ केले, तेव्हा असा प्रश्न विचारण्याची धमक कोकाटे किंवा सरकारने दाखवली नाही. मग शेतकऱ्यांनाच प्रश्न विचारण्याची हिंमत का होते? असा सवाल सपकाळ यांनी केला आहे.

शेतमालाला भाव नाही, शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे. शेतकरी संकटात असून तो दररोज  आत्महत्या करत आहे. शेतकरी आत्महत्येची (Suicide) कृषीमंत्री व भाजप युती सरकारला लाज वाटत नाही. उलट शेतकऱ्यांनाच अजब प्रश्न विचारला जातो. त्यामुळे हा सत्तेचा माज शेतकरी नक्की उतरवेल हे लक्षात ठेवा, असा इशाराही हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी दिला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : वीस लाखांची वसुली; सुरक्षारक्षकासह साथीदारावर अपहरणासह अवैध सावकारीचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik अंबड एमआयडीसीत (Ambad MIDC) समोरासमोर वर्कशॉप असल्याने झालेल्या ओळखीतून लघुउद्योजकाने एका वॉचमनकडून व्याजाने पाच लाख रुपये घेतले असता, त्याने सन...