Sunday, November 17, 2024
Homeराजकीयदेवेंद्रजींकडून त्रास झाला म्हणून बोललो - खडसे

देवेंद्रजींकडून त्रास झाला म्हणून बोललो – खडसे

मुंबई | Mumbai –

आजपर्यंत मी पक्षाच्या विरोधात, नेत्याच्या विरोधात कधीही बोललो नाही. मला देवेंद्रजींकडून त्रास झाला म्हणून बोललो असे

- Advertisement -

भाजपामध्ये नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. एकनाथ खडसे यांच्यावरील सुनील नेवे लिखित जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज खडसे फार्महाऊस येथे ऑनलाईन पद्धतीने झाला.

या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशन सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागळे यांनी पुस्तकाचे ऑनलाईन प्रकाशन केले. त्यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना एकनाथ खडसे यांनी या नेत्यांच्या उपस्थितीतच पक्षातून होत असलेल्या अन्यायाबाबत स्वपक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

आमचा मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होते. आरोप झाला की क्लिनचिट द्यायचे. पण नाथाभाऊंना दिली नाही. माझ्यावर एवढा राग का?, असा सवाल खडसे यांनी केला असून, लवकरच नानाजी फडणवीसाचं बारभाई कारस्थानफ पुस्तक लिहिणार असल्याची घोषणा त्यांनी केली. या पुस्तकात सबळ पुरावे मी देणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

ढ़सगळे म्हणतात नाथाभाऊ चांगले, मग तिकीट का दिले नाही? मुख्यमंत्री होऊ शकलो नाही याचं दुःख नाही. उत्तर महाराष्ट्राला कधीही मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, अशी खंत व्यक्त करत खडसे म्हणाले, आजपर्यंत मी पक्षाच्या विरोधात, नेत्याच्या विरोधात कधीही बोललो नाही. मला देवेंद्रजींकडून त्रास झाला म्हणून बोललो. पक्षाच्या विरोधात कधीही बोलणार नाही. आमचा मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होते. आरोप झाला की क्लिनचिट द्यायचे. पण नाथाभाऊंना दिली नाही. माझ्यावर एवढा राग का? नाथाभाऊ अन्याय सहन करणार नाही. स्वस्थ बसणार नेता नाही. मला न्याय मिळत नाही तो पर्यंत मी पक्षाला प्रश्न विचारणार आहे, अशा शब्दात खडसे यांनी टीका केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या