मुंबई | Mumbai
राज्यातील पाच शिक्षक,पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची (Vidhan Parishad Election) घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार अमरावती, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या विभागात निवडणूक पार पडणार आहे. निवडणूक आयोगाच्या या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
आमदारांच्या कार्यकाळाची मुदत संपत आल्याने रिकाम्या होणाऱ्या जागांसाठी (Seats) ही निवडणूक (Election) पार पडणार आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान होईल. तर २७ ऑक्टोबर मतमोजणी (Vote Counting) पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी २९ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे.
कोणत्या मतदारसंघांमध्ये होणार निवडणूक?
१) पुणे पदवीधर मतदारसंघ
२) नागपूर पदवीधर मतदारसंघ
३) औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ
४) अमरावती शिक्षक मतदारसंघ
५) पुणे शिक्षक मतदारसंघ




