Saturday, June 15, 2024
Homeमुख्य बातम्याशिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर 'या' दिवसापासून प्रत्यक्ष सुनावणी, विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार?

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर ‘या’ दिवसापासून प्रत्यक्ष सुनावणी, विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार?

मुंबई | Mumbai

- Advertisement -

खरी शिवसेना कोणाची, याचा फैसला आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर करणार आहेत. आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर ते येत्या १४ सप्टेंबरपासून प्रत्येक आमदाराची सलग सुनावणी घेणार आहेत. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाने परस्परांच्या विरोधात याचिका दाखल केल्या आहेत. त्याचा निकाल कधी आणि काय? लागणार याबाबत उत्सुकता आहे.

१४ सप्टेंबरला दुपारी बारा वाजता ही सुनावणी सुरु होणार आहे. शिवसेना ( शिंदे गट ) ४० आणि शिवसेना (उबाटा) १४ आमदारांची सुनावणी पार पडणार आहे. विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात सुनावणी होणार आहे. एकाच दिवशी सर्व आमदारांची सुनावणी असणार आहे. तब्बल ३४ याचिकांवर विधानसभा अध्यक्ष घेणार सुनावणी घेणार आहेत. वादी व प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करत म्हणणं मांडण्याची संधी देण्यात येणार आहे. प्रत्येक याचिकेची वेगळी सुनावणी केली जाणार असून संबंधित आमदारांना त्यावेळी बोलावलं जाणार आहे. विधानसभा अध्यक्षांकडे आलेल्या याचिकेच्या सुनावणी वेळी आमदाराना आपलं म्हणणं मांडायला संधी दिली जाणार आहे.

विधानसभा अध्यक्षांच्या सुनावणीवर अनेकांची भवितव्य ठरणार आहेत. या सुनावणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंही भवितव्य ठरणार आहे. तसेच सरकारचंही भवितव्य ठरणार आहे. शिंदे गटाकडे पक्ष आणि चिन्ह राहणार की नाही याचंही भवितव्य अवलंबून आहे. जसं शिंदे गटाचं भवितव्य या सुनावणीवर अवलंबून आहे. तसेच ठाकरे गटाचंही भवितव्य या सुनावणीवर अवलंबून आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्ष राहणार की नाही याचंही भवितव्य या सुनावणीत ठरणार आहे. या सुनावणीत आमदार अपात्र झाल्यास किंवा आमदार अपात्र नाही झाल्यास पुढील राजकीय गणितं ठरणार आहे. आमदार पात्र-अपात्रतेच्या निर्णयानंतर निवडणूक आयोगाचा निकालही बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या