Friday, May 15, 2026
Homeराजकीयमोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात खांदेपालट; जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपद सोडलं

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात खांदेपालट; जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपद सोडलं

आमदार शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP Sharad Pawar) पक्षात मोठे फेरबदल होणार असल्याची चर्चा सुरु होती. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून, आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात बोलतांना आपल्याला पक्षाने प्रदेशाध्यक्षपदाच्या (State President) जबाबदारीतून मुक्त करावे, असे म्हटले होते. त्यावर बोलताना शरद पवारांनी (Sharad Pawar) पक्षातील नेत्यांशी बोलून यावर निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. यानंतर अखेर याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार आज जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार झाले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांची निवड करण्यात आली आहे. शिंदे हे १५ जुलै रोजी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

ताज्या बातम्या

राज्याच्या पोलीस दलात मोठा फेरबदल; नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता...

0
मुंबई । मुख्यमंत्री देवेंद्र यांनी पोलीस दलात मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्याचा निर्णय घेतला असून शुक्रवारी गृह विभागांतर्गत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले....