Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Politics: काँग्रेसमध्ये या आणि सीएम व्हा! एकनाथ शिंदे, अजित पवारांना काँग्रेस...

Maharashtra Politics: काँग्रेसमध्ये या आणि सीएम व्हा! एकनाथ शिंदे, अजित पवारांना काँग्रेस नेत्याची ऑफर

मुंबई | Mumbai
राज्यात जागोजागी कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करून घेत महायुती काँग्रेसला खिळ-खिळी बनवत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या पक्षांकडून मोठ्या प्रमणात कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला जात आहे. यामुळे महायुतीमधील सर्वात मोठा भाऊ असलेल्या भाजपला चीतपट करण्यासाठी काँग्रेसने महायुती सरकारच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना गळ घालत मोठी ऑफर दिलीय.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने त्यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत असतात. त्यात अजित पवारही उघडपणे मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त करत असतात. धुळवडीच्या निमित्ताने काँग्रेसचे नेते आमदार नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघांनाही मुख्यमंत्रि‍पदाची ऑफर दिली आहे.

- Advertisement -

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सत्ताधारी नेत्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खास पद्धतीत होळीच्या शुभेच्छा दिल्या आहे. याचवेळी काँग्रेसमध्ये या आणि सीएम व्हा! अशी ऑफर पटोलेंनी अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना दिली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. नाना पटोले म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघांनीही अलर्ट झाले पाहिजे. सतर्क राहिले पाहिजे. आम्ही सोबत आहोत. होळीच्या या दोघांना शुभेच्छा देताना त्यांच्या सुरक्षेबाबत भूमिका मांडतोय. आमच्याकडे त्यांनी यावे, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. सध्या दोघांमध्ये मुख्यमंत्रि‍पदाची ओढ लागली आहे. काही दिवस एकाला, काही दिवस दुसऱ्याला या दोघांनाही मुख्यमंत्री बनवू. भाजपाच्या पाठिंब्यावर ते मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत. आम्ही त्यांना मुख्यमंत्री बनवू शकतो असे त्यांनी म्हटले.

भाजपचे मित्रपक्षांचे नेते अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे खूप त्रासलेले आहेत. महाराष्ट्रातील सर्व कारभार हा मुख्यमंत्री कार्यालयातून चालवला जाणार असल्याचा संकेत देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. फडणवीस दोन्ही नेत्यांना संपवण्याचं काम करत आहे. त्यामुळे माझी दोन्ही नेत्यांना खुली ऑफर आहे. जर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचे असेल तर आम्ही दोघांना मुख्यमंत्री बनवू. दोन्ही नेत्यांना आलटून-पालटून मुख्यमंत्री बनवू, असे नाना पटोले म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...