Tuesday, May 5, 2026
Homeमुख्य बातम्याManikrao Kokate : "मी जाहिरात…"; अखेर कोकाटेंचा 'त्या' व्हिडिओवर खुलासा, रोहित पवारांना...

Manikrao Kokate : “मी जाहिरात…”; अखेर कोकाटेंचा ‘त्या’ व्हिडिओवर खुलासा, रोहित पवारांना लगावला टोला, नेमकं काय म्हणाले?

नाशिक | Nashik

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा एक व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यामध्ये कोकाटे हे मोबाईलवर रमी खेळताना दिसत आहेत. या व्हिडीओवरून माणिकराव कोकाटे टीकेचे धनी झाले असून, विरोधकांकडून त्यांचा चांगलाच समाचार घेतला जात आहे. त्यानंतर आता या व्हिडीओवर मंत्री कोकाटे यांनी माध्यमांशी बोलतांना स्पष्टीकरण दिले आहे.

- Advertisement -

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, “माझ्या फोनवर जंगली रमीची जाहिरात आली होती. ती जाहिरात मी स्किप करत होतो. ती जाहिरात स्किप करण्यासाठी मला दोन ते तीन सेकंद लागले. मात्र, रोहित पवारांनी त्या व्हिडीओत १८ सेकंद दाखवले आहेत. त्यांनी अजून पुढे दाखवले असते तर मी तो व्हिडीओ स्किप करत होतो हे दिसले असते. पंरतु, त्यांनी ते दाखवले नाही” असे त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, “विरोधीपक्ष कधी माझ्या गाडीवर, कधी कपड्यावर तर कधी मोबाईलवर बोलतात. मात्र, ते कधी मी शेतकऱ्यांसाठी केलेल्या उपाययोजनांसह चांगल्या कामांवर बोलत नाही. त्यामुळे माझे काम पारदर्शक असून, स्वभाव देखील स्पष्ट आहे. विधानसभेत चोवीत तास सीसीटीव्ही कॅमरे चालू असतात, त्यामुळे मी कशाला रमी गेम खेळत बसेल”, असेही माणिकराव कोकाटे यांनी म्हटले.

ते पुढे म्हणाले की, “अधिवेशनाच्या वेळी खालच्या सभागृहात काय चालू आहे, हे बघण्यासाठी मी युट्युब उघडले. त्याच्यावर रमीचा गेम आला, तो गेम मी स्किप करत होतो. त्यावेळी तिथे असणाऱ्या कुणीतरी तो व्हिडीओ काढला असेल, मला याबद्दल काही माहिती नाही. मला तो व्हिडीओ काढून मुद्दाम टार्गेट केले जात आहे. शेतकऱ्यांची काळजी फक्त रोहित पवार यांनाच आहे का, आम्हाला नाही का? स्वत:ची करमणूक करून घेण्यासाठी हे रिकामे उद्योग सुरु आहेत”, असे म्हणत कोकाटे यांनी रोहित पवारांना टोला लगावला.

ताज्या बातम्या

अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

0
पुनदखोरे | वार्ताहर कळवण शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून कळवण पोलीस ठाणे हद्दीत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर, ओतूर रोड लगत एका अनोळखी...