Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Politics : "अशा मंत्र्यांना..."; मंत्री जयकुमार गोरेंवर खासदार संजय राऊतांची टीका

Maharashtra Politics : “अशा मंत्र्यांना…”; मंत्री जयकुमार गोरेंवर खासदार संजय राऊतांची टीका

मुंबई | Mumbai

राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यावर एका महिलेने (Woman) गोरे यांनी स्वत:चे नग्न फोटो पाठवल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून मंत्री गोरेंवर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. अशातच आता यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री जयकुमार गोरे यांचे नाव घेत सरकारला टार्गेट केले आहे.

- Advertisement -

यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, “मंत्री जयकुमार गोरे यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील महिलेचा छळ आणि विनंयभंग केला आहे. ही माहिती अंत्यंत गंभीर आणि महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. तो मंत्री तुमच्या मंत्रिमंडळात (Cabinet) असेल तर त्यामुळेही महाराष्ट्र कलंकित होतो. जयकुमार गोरे हे विकृत मंत्री आहेत. अशा मंत्र्यांना लाथ मारली पाहिजे अशी परखड टीका त्यांनी केली आहे. तसेच पुढील काही दिवसांत ही महिला विधानभवनासमोर उपोषणाला बसणार आहे”, असेही त्यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, “संजय राठोड तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. आता हे पात्र पुन्हा निर्माण झाले आहे. फडणवीसांनी मंत्रिमंडळाचे पत्ते पु्न्हा एकदा पिसले पाहिजे. आणि सर्व मंत्र्‍यांची झाडाझडती घेतली पाहिजे. तसेच असे मंत्री असतील तर महिला अत्याचाराविरुद्ध, महिलांच्या सबलीकरणावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) कसे बोलणार आहे. असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यासोबतच हे प्रश्न मी अमित शाह यांच्याकडे पाठवणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...