Sunday, May 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Politics : 'शेतकऱ्यांनो विसरा हमी, खेळा रम्मी'; 'त्या' व्हिडिओनंतर मंत्री कोकाटेंवर...

Maharashtra Politics : ‘शेतकऱ्यांनो विसरा हमी, खेळा रम्मी’; ‘त्या’ व्हिडिओनंतर मंत्री कोकाटेंवर विरोधकांचा हल्लाबोल

मुंबई | Mumbai

राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा विधीमंडळामध्ये (Vidhimandal) रमी गेम खेळतानाचा व्हिडीओ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एक्स पोस्ट केला आहे. या व्हिडीओमुळे कृषीमंत्री कोकाटे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे या व्हिडिओनंतर कोकाटेंवर विरोधकांनी (Opponent) हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एक्स हँडलवरून ट्विट करत कोकाटे यांना चांगलाच चिमटा काढला आहे. ‘शेतकऱ्यांनो (Farmer) विसरा हमी, खेळा रम्मी’, असे म्हणत आव्हाड यांनी कोकाटे यांना सणसणीत टोला लगावला आहे. तसेच लोकशाहीच्या पवित्र मंदिरात सत्ताधारी आमदार (MLA) काय काय करतात हे समोर येते. शेतकऱ्यांविषयी उलटसूलट वक्तव्य करायचे. दुसरीकडे जंगली रमीमुळे अनेक आत्महत्या झाल्या आहेत. तोच खेळ मंत्री सभागृहात खेळत आहेत, अशी टीकाही आव्हाड यांनी व्हिडीओ समोर आल्यानंतर केली होती.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी हे जनतेच्या बोकांडी बसलेल नतभ्रष्ट सरकार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात असं सरकार पुन्हा होणार नाही. कोणाचीच परवा नसलेल हे सरकार आहे. शेतकरी कर्जाखाली दबलेला आहे. आठ ते दहा शेतकरी रोज आत्महत्या (Suicide) करत आहे. वन थर्ड शेतकरी हे पीक विम्याचे राज्य सरकार भरत होते. आता पूर्णतः पिक विमा शेतकऱ्याला भरायचा आहे. मत घ्यासाठी एक रुपयात विमा आता मात्र तुमचं तुम्ही बघा अशी भूमिका सरकार घेत आहे. भाजपवाल्यांनी कोकाटे यांना केवळ नावालाच मंत्री केले आहे. त्यामुळे त्यांना काम उरलेले नाही, म्हणून ते रमी खेळत आहे. किंवा अधिकार नसल्यामुळे यांना काही करायची इच्छा नसेल. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा अशी अवस्था झाली आहे. अशी टीका त्यांनी केली.

सुधीर मुनगंटीवार यांनी टोचले कान

भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले की, “आमदार, मंत्री म्हणून आपण मर्यादा ठेवाव्यात. आपले वर्तनाने चुकीचा संदेश जाऊ नये. याविषयीची एथिकल कमिटी-नैतिक समिती निश्चितच भूमिका घेईल. कारण हा प्रकार सभागृहात झाला आहे. हा व्हिडिओ मी पाहिलेला नाही. पण राज्यात आमदारांच्या चुकीच्या वर्तवणुकीवर नैतिक समिती निर्णय घेईल. सभागृहात अशा प्रकारची कोणतीही घटना होऊ नये, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे त्यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

बारामती पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी; प्रशासनाची जय्यत तयारी

0
बारामती | बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान पार पडले असून, या निवडणुकीची मतमोजणी उद्या सोमवारी (दि.४) महाराष्ट ्र राज्य सकाळी ८ वाजेपासून सुरू...