Wednesday, May 29, 2024
Homeमुख्य बातम्या“उद्धव ठाकरे येतील, भाषण करतील अन्...”; खेडमधील सभेपूर्वी रामदास कदम बरसले

“उद्धव ठाकरे येतील, भाषण करतील अन्…”; खेडमधील सभेपूर्वी रामदास कदम बरसले

खेड | Khed

उद्धव ठाकरे हे आज रामदास कदम यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या रत्नागीरी मधील खेड येथे जाहीर सभा घेणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगानं ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह शिंदे गटाला बहाल केल्यानंतर उद्धव ठाकरेंची ही पहिलीच सभा आहे. त्यामुळे या सभेतून उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

- Advertisement -

दरम्यान या सभेपूर्वी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी मला व माझ्या मुलाला कायमचे संपवण्यासाठी प्रयत्न केले असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

सुप्रिया सुळेंनी मटण खाऊन घेतलं देवदर्शन; शिवसेनेच्या नेत्याकडून टीकास्त्र

रामदास कदम म्हणाले, खेड हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि असेल त्यामध्ये कसलाच फरक पडणार नाही असे रामदास कदम म्हणाले. उद्धव ठाकरे येत आहेत म्हणून मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पुणे, सिंधूदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातून लोक आणण्याची मोठी तयारी चालली आहे. जणू खेडली शिवाजी पार्कावर दसरा मेळाव्याची जाहीर सभाच आहे. सभेसाठी बाहेरून लोकं आणली जात आहेत यावरून रामदास कदम यांचा किती धसका घेतलाय हे स्पष्ट होतंय.

भयंकर! अल्पवयीन मुलीने Youtube बघून केली स्वतःची प्रसुती अन् नवजात बाळाला…

तसेच, उद्धव ठाकरे येतील, भाषण करतील आणि निघून जातील. पण त्या सभेला इथले स्थानिक किती असणार? दोन चार टक्के तरी आहे का? म्हणून मला त्याची काळजी नाही. त्यांनी यावं, बोलावं, जावं. आम्हाला त्याची काही फिकीर नाही. आम्ही त्यांची नोंदही घेत नाही. पण या सर्वांना उत्तर त्याच ठिकाणी त्याच मैदानावर १९ मार्चला दिलं जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, शंभुराज देसाई आणि भरत गोगावले या सभेला येणार आहेत. या सभेतून त्याच ठिकाणी उद्धव ठाकरे यांना व्याजासह सर्व उत्तर दिलं जाणार आहे, असं रामदास कदम म्हणाले.

Vada Pav : जगातील सर्वोत्तम सँडविचेसच्या यादीत ‘वडापाव’चा समावेश

पुढे बोलताना ते म्हणाले, रामदास कदम आख्या महाराष्ट्राला माहित आहे. माझ्या मुलाला निवडून कसं आणायचं हे मला चांगलंच माहिती असून आपल्याच पक्षाच्या नेत्याला पाडायचं आणि दुसऱ्याच्या आमदाराला भाड्याने घ्यायचं काम ठाकरे करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. राज्यात बदल झाला नसता तर आम्हांला संपवण्यात उद्धव यशस्वी झाले असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला आहे. सारखं खोके म्हणतात, आम्हांला विकासकामांसाठी सरकारने खोके दिलेत. त्यातून आम्ही लोकांची विकासकामे करत असल्याची खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

विमानात पुन्हा किळसवाणा प्रकार! मद्यधुंद अवस्थेत सहप्रवाशावर केली लघुशंका
Watermelon : लालेलाल-रवाळ कलिंगड कसं निवडाल? सोप्या टिप्स जाणून घ्या…

- Advertisment -

ताज्या बातम्या