Thursday, May 15, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut : "राज ठाकरेंचा पक्ष म्हणजे मुक्त विद्यापीठ, कोणीही जावे खिचडी...

Sanjay Raut : “राज ठाकरेंचा पक्ष म्हणजे मुक्त विद्यापीठ, कोणीही जावे खिचडी मात्र…”; राऊतांचा निशाणा, नेमकं काय म्हणाले?

नारायण राणेंचे केले कौतुक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

शिवसेना (Shivsena) पक्षातून बाहेर पडताना नारायण राणे व राज ठाकरे (Narayan Rane and Raj Thackeray) यांनी पक्षावर दावा न सांगता नवा पक्ष काढून आपली सिद्धता समोर मांडली. मात्र, दुसरीकडे मीच बाळासाहेब ठाकरे, माझीच शिवसेना खरी असा कांगावा करून अमित शाह (Amit Shah) यांच्या मागे लपणाऱ्या एकनाथ शिंदे यांची बोंबाबोंब किती पास्कळ आहे याचा प्रत्यय येत असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली.

बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही उद्धव ठाकरेंची मूळ शिवसेना आहे. शिंदे यांचा गट एक असून, अमित शहा यांनी ठरवले म्हणून तो अस्तित्वात आला आहे. शरद पवारांचा पक्ष हा मूळ पक्ष असून, अजित पवारांचा गट आहे. त्यामुळे ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग (Election Commission) जोपर्यंत सरकारच्या ताब्यात आहे तोपर्यंत अमित शहा ठरवतील तेच होईल, असेही संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

कुंभमेळ्याच्या निधीवर डोळा

कुंभमेळ्याच्या कामावर प्रत्यक्षात दोन पक्षांमध्ये वाद आहे. दोन्ही युतीचे असल्यामुळे गिरीश महाजन व मालेगावचे मंत्री यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. दहा ते पंधरा हजार कोटी रुपयांचा निधी कसा हडपता येईल अशा लोकांच्या हाती शहर देण्यात येत आहे. कुंभमेळ्याचे राष्ट्रीय महत्त्व असून, यातले नेमके किती रुपये कामावर खर्च होतील याबद्दल शंकाच निर्माण होत आहे. नेत्यांना यातून जास्त वाटा हवा आहे जो निवडणुकीत वापरता येईल, अशी टीकाही संजय राऊत यांनी यावेळी केली. तसेच साधुसंत सिंहस्थाच्या कामाबद्दल ओरड करीत असल्याचे निदर्शनास आणले असता संजय राऊत म्हणाले की, साधुसंत ही भाजपच्याच टाळकोटेपणा करतात. बैठका का घेता, त्यांनी थेट सरकारकडे सिंहस्थ कामांबाबत नाराजी व्यक्त करणे गरजेचे असल्याचेही राऊत म्हणाले.

राज ठाकरे यांचा पक्ष म्हणजे मुक्त विद्यापीठ

राज ठाकरे यांनी प्रस्ताव मांडला होता, त्यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सकारात्मक भूमिका घेतली. आम्ही एकत्र आलो तर आपल्याला इतरांशी संबंध ठेवता येणार नाही, अशी भूमिका आम्ही मांडली आहे. प्रत्यक्षात राज ठाकरे यांचा पक्ष म्हणजे सध्या मुक्त विद्यापीठ आहे. कोणीही जावे खिचडी मात्र निश्चित मिळेल अशी काहीशी स्थिती झालेली आहे, असेही संजय राऊत शेवटी म्हणाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...