Wednesday, December 4, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्य प्रश्नांना बगल देण्यासाठी हिंदुत्वाचा अजेंडा; शिंदे-फडणवीसांच्या अयोध्या दौऱ्यावर पवारांची टीका

मुख्य प्रश्नांना बगल देण्यासाठी हिंदुत्वाचा अजेंडा; शिंदे-फडणवीसांच्या अयोध्या दौऱ्यावर पवारांची टीका

नाशिक | Nashik

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल अयोध्येत पोहोचले आहेत. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या मंत्र्यांसोबत अयोध्येला जात आहेत.

- Advertisement -

दोन्ही नेते अयोध्येत प्रभू श्रीरामाची महाआरती करणार आहेत. त्यानंतर राम मंदिर बांधकामांची पाहणी करणार आहे. या दौऱ्यात संपूर्ण मंत्रीमंडळ असून यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी टीका केली आहे.

नशिबाने मारले अन् देवाने तारले… ऊस तोडणी मजूर महिलेची बसस्थानकातच प्रसूती

राज्यात वादळी पाऊस, गारपीट असताना राज्याचे सर्व मंत्रिमंडळ अयोध्येला गेले आहे. राज्याचे, देशाचे मुख्य प्रश्न सोडवण्यची दृष्टी ज्यांच्याकडे नाही, असे लोक लक्ष विचलीत करण्यासाठी असे काही तरी प्रकार करतात, अशा शब्दांत शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला खडेबोल सुनावले आहे.

अवकाळी पावसाचे थैमान! घरांचं नुकसान, विज गायब, हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त

शरद पवार म्हणाले, पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हे सर्व अस्वस्थ करणारे आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांना त्याची चिंता नाही. अयोध्येच्या प्रश्नापेक्षा राज्यात अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. मात्र, आज राज्याचे सर्व मंत्रिमंडळ, आमदार, खासदार अयोध्येला जाऊन बसले आहेत. याचा अर्थ मुळ प्रश्नांना त्यांना बगल द्यायची आहे.

राजकारणाच्या घसरलेल्या पातळीवर पवार म्हणाले, की, प्रत्येकाला समजलं पाहिजे, की बोलताना कसं बोलाव, कोणत्या प्रश्नसाठी आग्रह धरावा, हा लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे. त्यांना शिवीगाळीचा रस्ता योग्य वाटत असेल तर त्यांना तो अधिकार आहे.

अदानी प्रकरणी JPCची गरज नाहीच, पण का?.. जाणून घ्या, काय म्हणाले शरद पवार?

कर्नाटकातील परिस्थितीवर बोलताना पवार म्हणाले की, भाजपचा तिथे पराभव होणार आहे. तर काँग्रेसला विजय मिळणार आहे. याबाबत मी अनेकांशी चर्चा केली आहे. तसेच कर्नटकात काही जागांवर राष्ट्रवादी उमेदवार देणार असल्याच पवार यांनी म्हटलं.

मुख्यमंत्र्यांचा दौरा महत्त्वाचा का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दौऱ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात मोठा संदेश देण्याची तयारी सुरु आहे. शिवसेनेचा शिंदे गट हिंदुत्वाच्या अजेंड्यावर स्वत:ला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा दौरा प्रभावी भूमिका बजावण्याची शक्यता आहे.

जवळ्यात धाडसी दरोडा… महिलांना मारहाण करत लाखोंचा ऐवज लंपास

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या