Wednesday, January 7, 2026
Homeमुख्य बातम्याShivsena UBT : शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर; कुणाच्या नावाचा समावेश?

Shivsena UBT : शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर; कुणाच्या नावाचा समावेश?

मुंबई | Mumbai

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाने पक्षप्रमख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षाच्या प्रवक्तेपदाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यात संजय राऊत आणि अरविंद सावंत (Sanjay Raut and Arvind Sawant) यांची मुख्य प्रवक्तेपदी (Spokesperson) निवड करण्यात आली आहे. तर इतर सहा जणांवर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

- Advertisement -

यामध्ये शिवसेना नेते अॅड. अनिल परब, खासदार आणि पक्षाच्या उपनेता प्रियंका चतुर्वेदी, जनसंपर्कप्रमुख अॅड. हर्षल प्रधान, उपनेता सुषमा अंधारे, आनंद दुबे आणि जयश्री शेळके यांचा समावेश आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून (Shiv Sena Central Office) प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली.

YouTube video player

शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केलेल्या पत्रात नेमकं काय?

उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षाच्या प्रवक्तेपदाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यात मुख्य प्रवक्तेपदी शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली असून इतर सहा जणांवर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवसेना पक्षाची भूमिका प्रसारमाध्यमांमध्ये मांडण्यासाठी त्यांना अधिकृत करण्यात आले आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली. यासोबतच उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सर्व शिवसेना नेते पक्षाची भूमिका वेळोवेळी मांडत असतात, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...