Sunday, April 6, 2025
HomeराजकीयSanjay Raut : "शिवसेना फोडायची आणि मोदींच्या पायाशी नेऊन ठेवायची हे..."; राऊतांचा...

Sanjay Raut : “शिवसेना फोडायची आणि मोदींच्या पायाशी नेऊन ठेवायची हे…”; राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

नाशिक | Nashik

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे नाशिक दौर्‍यावर (Nashik Tour) असून त्यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी ‘वक्फ बोर्डाच्या दोन लाख कोटींच्या जमिनी आणि हिंदुत्व यांचा काय संबंध आहे? आम्ही हिंदुत्वाचं मोठं काम केलं असं भाजपाकडून सांगितलं जातं आहे. भाजपा हिंदूंना मूर्ख समजतं आहे का? दोन लाख कोटींच्या जमिनी यांना खायच्या आहेत असा आरोप करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) टीकास्त्र सोडले.

- Advertisement -

यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, “वक्फ बोर्डाच्या (Waqf Board) इमारतीवरती उद्योगपतींची अलिशान घरे उभी आहेत. ती कायदेशीर करण्यासाठी बिल आणले आहेत. हे मोठे उद्योगपती कोण तुम्हाला माहिती आहे. २०१४ पासून २०२४ पर्यंत मोदींचे सरकार आहे. २०१४ ते २०२४ या काळामध्ये या सरकारला गरीब मुसलमान वक्फ बोर्डातील घोटाळा दिसला नाही. २०१४ ते २०२४ पर्यंत देशातील सगळी संपत्ती विकून झाली, सार्वजनिक संपत्ती विकून झाली. उद्योगपतींच्या असं लक्षात आलं की आता विकायला काही उरलं नाही. मग यांचे लक्ष या वक्फ बोर्डाच्या संपत्तीकडे गेले, आता हे विकले पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी हे विधेयक आणले आहे. सगळा देश विकून झाल्यावर त्यांना वक्फ बोर्डाची दोन लाख कोटी रुपयांची संपत्ती दिसली. ही संपत्ती आपल्याच माणसांना मिळायला पाहिजे आणि मग त्यांनी हे वक्फ बोर्डाचे विधेयक सुधारणा विधायकाच्या नावाखाली आणले. या संपत्तीचा गोर गरिबांना काय फायदा होणार आहे? भविष्यामध्ये मुस्लिमांच्या या सगळ्या संपत्ती भारतीय जनता पक्षाच्या संबंधित उद्योगपतींच्या किंवा त्यांच्या नेत्यांच्याच घशात जाणार आहेत हे सत्य आहे. हिंदुत्वाचं नाव द्यायचं आणि जमिनी बळकवायच्या हे यांचं धोरण आहे”, असे त्यांनी म्हटले.

पुढे एकनाथ शिंदेंवर टीका करतांना ते म्हणाले की, “शिवसेना (Shivsena) फोडायची आणि मोदींच्या पायाशी नेऊन ठेवायची हे एकच एकनाथ शिंदेचे ड्रीम प्रोजेक्ट होते. पण शिंदेंच्या या ड्रीम प्रोजेक्टला यश मिळाले नाही. काही आमदार खासदार गेले असतील शिवसेना आजही मजबूतीने उभी आहे”, असे राऊत यांनी म्हटले. तसेच एकनाथ शिंदे यूटी म्हणजे यूज अँड थ्रो असं उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) म्हणाले आहेत, यावर राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, “युज अँड थ्रो मध्ये बी आहे ना बाळासाहेब ठाकरे आहेत. बाप मध्ये आहे ना तो कसा विसरता? जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत कुणी काही करु शकत नाही”, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

तसेच “भारतीय जनता पक्षाची (BJP) जी स्थापना आहे ती आमच्या समोर झाली आहे. जनता पक्षाचे विघटन झाल्यावर १९७८ नंतर या पक्षाची स्थापना झाली आणि मूळ शिवसेना जी आहे ही भारतीय जनता पक्षाला सिनियर आहे. आमचा जन्म त्यांच्या आधी झाला आहे. शिवसेनेचा ६० च्या दशकात आणि हे ७८ साली जन्माला आले. त्याच्यामुळे आमच्या समोर यांचा जन्म झालेला आहे. पण तेव्हा एका उदात्त हेतूने यांचा जन्म झाला ज्यांनी हा पक्ष जन्माला घातला ते आज शहाजहानसारखे बिचारे तुरुंगात आहेत. लालकृष्ण आडवाणी ते पक्षाचे संस्थापक मुरली मनोहर जोशी, अटलजी गेले आणि आता पक्ष दुसऱ्याच लोकांनी हायजॅक केला. हा खरा भारतीय जनता पक्ष नाही नाही”, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

राऊतांचा राज ठाकरेंना टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बँकांतील मराठी भाषेच्या आग्रहासाठी आंदोलन जाहीर केले होते. हे आंदोलन सुरू होण्याआधीच मागे घेण्यात आले. त्यामुळे राज ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आहेत. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “राज ठाकरे यांनी त्यांच्या राजकारणाची (Politics) परंपरा पाळली. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. राज ठाकरे यांच्या परंपरा काय आहेत, हे मी सांगायला पाहिजे का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Waqf Amendment Bill : देशात नवा कायदा अस्तित्वात; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू...

0
नवी दिल्ली | New Delhi वक्फ सुधारणा विधेयकाला लोकसभा आणि राज्यसभेत (Loksabha and Rajyasabha) मंजुरी मिळाली (Waqf Amendment Bill 2025) होती. त्यानंतर आता राष्ट्रपती द्रौपदी...