Saturday, April 12, 2025
Homeमुख्य बातम्याSanjay Raut : "महाराष्ट्रातील एक बकरा खाटकाच्या लाकडावर उभा, त्याला..."; राऊतांचे ट्विट,...

Sanjay Raut : “महाराष्ट्रातील एक बकरा खाटकाच्या लाकडावर उभा, त्याला…”; राऊतांचे ट्विट, रोख नेमका कुणाकडे?

मुंबई | Mumbai

शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट करत शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. या ट्विटमध्ये एक बकऱ्याचा फोटो असून खबर पता चली क्या? एसंशि गट असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर आता राऊतांच्या या ट्विटची जोरदार चर्चा सुरु झाली असून, आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत माध्यम प्रतिनिधींनी त्यांना या ट्विटचा अर्थ विचारला. यावेळी, त्यांनी त्यातील काही माहिती सांगत संकेत दिले. परंतु स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला.

- Advertisement -

यावेळी राऊत यांना ट्विटबाबत प्रश्न विचारण्यात आला असता त्यावर बोलताना ते म्हणाले की,”महाराष्ट्रातील एक बकरा खटकाजवळ उभा आहे. त्याला खटकाच्या लाकडावर उभे करण्यात आले आहे. त्याला कापण्याची तयारी करण्यात आली आहे. त्याला सांगितले फार शहाणपणा करु नको. गप्प बस, फक्त बे बे करत रहा, असे दिल्लीतून कोणीतरी त्या बकऱ्याला सांगितले आहे”, असे म्हणत राऊतांनी शिंदेंना टोला लगावला.

तसेच राऊत यांना ट्विटवर खाली उल्लेख केलेल्या ‘एसंशी’ गट याचा अर्थ काय? असे विचारले असता ते म्हणाले, “तुम्हाला समजले पाहिजे, एसंशि गट काय आहे? तुम्हाला यूबीटी माहिती आहे ना मग तुम्हाला एसंशि गट माहिती नाही का? असे संजय राऊत यांनी यावेळी म्हटले.

अमित शहा यांच्यावर टीकास्त्र

छत्रपती शिवाजी महाराजांची आज पुण्यतिथी असून, देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते रायगडावर जाऊन महाराजांना अभिवादन करणार आहेत. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “अमित शहा गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे लष्कराचं हेलिकॉप्टर आहे. ते काय पंडित नेहरूंप्रमाणे जसे ते प्रतापगडावर मोटारीने पुढे गेले आणि चालत गेले. तसे तर येत नाहीत ते, महायुतीचा जेवणाचा जंगी कार्यक्रम आहे. एकनाथ शिंदे आणि आशिष शेलार यांचे नेते आहेत. त्यातील शिंदेंच्या पक्षाचे अमित शहा पक्षप्रमुख आहेत. त्यांनीच या पक्षाला जन्म देण्याचं काम केलं आहे. मा पाहिलं काल शिंदेंची फार तयार सुरू होती कारण पक्षाचे ते प्रमुख आहेत. त्यामुळे पक्षाचे प्रमुख येत असल्याने शिंदेंना भेटावंच लागेल, असं संजय राऊत यांनी म्हटले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : अंजनेरी पर्वतावर दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला; ८...

0
नाशिक | Nashik जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka) अंजनेरी पर्वतावर दरवर्षी हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti) निमित्ताने मोठया संख्येने भाविक येत असतात. यावर्षी देखील हनुमान जयंतीच्या...