Thursday, May 15, 2025
HomeराजकीयSanjay Raut : "ट्रम्प यांना कुलदैवत माना अन् गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा";...

Sanjay Raut : “ट्रम्प यांना कुलदैवत माना अन् गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा”; राऊतांचा महायुतीवर घणाघात

मुंबई | Mumbai 

- Advertisement -

जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पहलगाममध्ये (Pahalgam) दहशतवाद्यांनी (Terrorist) केलेल्या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची ९ तळे उद्ध्वस्त केली होती. त्यामुळे पाकिस्तानने बिथरून भारत आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ला चढवला होता. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करत युद्धबंदीची घोषणा केली. या घोषणेवरून विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली होती. अशातच आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना राज्यातील महायुती सरकारवर (Mahayuti Government) निशाणा साधला आहे.

यावेळी ते म्हणाले की, “तिरंगा यात्रा काढली जात आहे. मात्र, यात्रा काढण्याचे कारण काय? कसलं श्रेय? शस्त्रसंधीचं आणि माघारीचं श्रेय का? युद्धविराम, माघार, शस्त्रसंधी हाच विजय मानून एक पक्ष एका देशामध्ये विजय सोहळा साजरा करतो. युद्धविराम ट्रम्प यांच्या माध्यमातून झाला असून, या लोकांनी अमेरिकेचा झेंडा हातात घेऊन डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची यात्रा काढली पाहिजे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, जेपी नड्डा यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची यात्रा काढावी. तसेच गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा आणि ट्रम्प यांचा पुतळा उभा करा. त्यावर अमेरिकेचा झेंडा फडकवा आणि म्हणा आमचं कुलदैवत डोनाल्ड आहे”, अशी खरमरीत टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली.

पुढे ते म्हणाले की, “एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील डोनाल्ड यात्रा काढावी. त्यांना कळतं का? युद्धबंदी, शस्त्रसंधी काय असते? आमदार-खासदार विकत घेऊन सरकार बनवण्या इतकं सोपं आहे का? ते निवडणूक आयोगाला हातात धरून पक्ष ताब्यात घेण्याइतकं सोपं नाही. युद्धाच्या मैदानातून तुम्हाला खेचलं आहे. आता टेंभी नाक्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतळा बसवा आणि वरती अमेरिकेचा (America) झेंडा लावा. कारण, तुम्हाला युद्धबंदीचा विजय ट्रम्पमुळेच मिळाला आहे ना”, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, “बलुचिस्तान स्वतंत्र व्हावे म्हणून भारताने मदत करावी, अशी गरज होती. पण तेवढंही केले नाही. मिस्टर मोदी आणि अमित शहा, तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल, आणि तो दिवस लवकरच येईल”, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...