मुंबई | Mumbai
काल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर (Tejasvee Ghosalkar) यांनी आपल्याकडे असणाऱ्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता.यावेळी त्यांनी स्थानिक नेतृत्वावरील नाराजीतून राजीनामा देत असल्याचे म्हटले होते. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाला (Thackeray Group) हा मोठा धक्का मानला जात होता. त्यानंतर आज तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलतांना या भेटीबाबत भाष्य केले.
यावेळी घोसाळकर म्हणाल्या की,”माझी आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट झाली, माझ्या ज्या काही तक्रारी होत्या त्या मी पक्षप्रमुखांकडे मांडल्या आहेत. त्याबद्दल त्यांनी काही उत्तर दिली, काही उत्तरे अजून येणे बाकी आहेत. त्यामुळे, सध्या मी यावर काही सांगणार नाही. मात्र, नाराजी दूर झाली आहे का? हे लवकरच तुम्हाला समजेल, असे त्यांनी म्हटले.
तसेच “खालच्या स्तरावर काही गोष्टी स्पष्ट होणे त्यावेळी गरजेचे होते, पण त्या झाल्या नाहीत, त्यामुळे याठिकाणी यावे लागले. ज्या काही गोष्टी होत्या त्या उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केल्या. मी अजून कुठल्याही पक्षामध्ये (Party) जाण्याचा विचार केलेला नाही. याशिवाय मी गद्दारी केलेली नसून, या सगळ्यावर विचार करेन आणि मग सांगेन. मी सदैव उद्धव ठाकरेंसोबत आहे”, असे तेजस्वी घोसाळकर यांनी सांगितले.
दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर माजी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर भाजपमध्ये किंवा शिंदेच्या शिवसेनेत (BJP and Shinde Shivsena) प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच गेल्या महिन्यामध्ये (Month) तेजस्वी घोसाळकर यांना व्हॉट्सअप ग्रुपवर जीवे मारण्याची धमकी आली होती. तेजस्वी घोसाळकर यांच्या नावाने व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज शेअर करण्यात आला होता. ‘लालचंद इनको देखकर सुधर जा, इसकी बिवी को मत मरवा देना लालचंद’, अशा आशयाचा त्यामध्ये मजकूर होता.
तेजस्वी घोसाळकरांनी राजीनाम्यात काय म्हटले होते?
मी, तेजस्वी घोसाळकर महिला दहिसर विधानसभा प्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), या पदावरून वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत आहे. या पदावर कार्य करताना मला पक्षाच्या कार्यपद्धतीशी एकनिष्ठ राहून कार्य करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी पक्षप्रमुख व आपले मन:पूर्वक आभार मानते. माझा हा राजीनामा स्वीकारावा, ही नम्र विनंती.