Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Politics : विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला; 'या' नेत्याची लागणार...

Maharashtra Politics : विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला; ‘या’ नेत्याची लागणार वर्णी

मुंबई | Mumbai

मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) राज्यात महायुतीला २३७ जागांवर घवघवीत यश मिळाले. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) केवळ ४९ जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे विधानसभेत विरोधी पक्षनेता असणार का? याबाबत प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर अखेर विधानसभेला विरोधी पक्षनेतेपद (Leader of the Opposition) मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे.

- Advertisement -

महाविकास आघाडीमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला आले आहे. तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळणार आहे. यामध्ये विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून ज्येष्ठ नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांचे नाव अंतिम झाले आहे. लवकरच यासंदर्भात पक्षाकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र देखील पाठवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता भास्कर जाधव यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागणार आहे.

दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेकडून (Thackeray’s Shiv Sena) विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी आमदार आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) यांचे देखील नाव आघाडीवर होते. मात्र, भास्कर जाधव हे पक्षातील ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील अनुभवी सदस्य असल्याने त्यांना ही संधी देण्यात आल्याचे बोलले जात आहे. भास्कर जाधव हे एक आक्रमक नेते असून ते महाविकास आघाडीचे प्रतिनिधत्व करताना आपले मुद्दे अधिक आक्रमकपणे सभागृहात मांडू शकतात.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...