Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Politics : धामधूम संपली, धाकधूक सुरू; मतदानापूर्वी रात्री पैशांचा खेळ आणि...

Maharashtra Politics : धामधूम संपली, धाकधूक सुरू; मतदानापूर्वी रात्री पैशांचा खेळ आणि राडा

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

राज्यातील महापालिका निवडणुकीचा (Municipal Election) रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मंगळवारी सायंकाळी ५ वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता धाकधूक सर्वच उमेदवारांची वाढली आहे. गुरुवारी सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. मात्र, मतदानापूर्वीच्या (Voting) ‘कत्तल की रात’मध्ये अनेक ठिकाणी राडे, पैसे वाटपाचे आरोप आणि जीवघेण्या हल्ल्याच्या घटना समोर आल्याने खळबळ माजली आहे.

- Advertisement -

मुंबईचे (Mumbai) लक्ष लागून असलेल्या वरळी मतदारसंघात मध्यरात्री मोठा राडा झाला. ठाकरेंची साथ सोडलेल्या एका बड्या नेत्याच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हेमांगी वरळीकर यांच्या पतीला पैसे वाटप करताना पकडल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे गट) कडून करण्यात आला. या घटनेमुळे वरळीत तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आमदार सतेज पाटील यांनी एक खळबळजनक व्हिडिओ जारी केला आहे.

YouTube video player

या व्हिडिओमध्ये (Video) एका व्यक्तीने असा दावा केला आहे की, कोल्हापूरच्या सत्ताधारी आमदाराने मतदानापूर्वी ४० लाख रुपये घेतले आहेत. या व्हिडिओ बॉम्बमुळे कोल्हापुरात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. उल्हासनगरमध्ये निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ५० लाख रुपयांची रोकड पकडली. विशेष म्हणजे, ही रक्कम एका अपक्ष उमेदवाराने सतर्कता दाखवत पकडून दिली. ही रक्कम नेमकी कोणाची होती आणि कोणाला वाटण्यासाठी जात होती, याचा तपास निवडणूक आयोग आणि पोलीस करत आहेत.

दोन्ही शिवसेना भिडल्या

मुंबईच्या वॉर्ड क्रमांक १२४ मध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. हे दोन्ही गट एकमेकांना भिडल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. या मारहाणीत ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नाशकात ‘आप’ उमेदवारावर बंदूक रोखली

नाशिकमध्ये निवडणुकीला हिंसक वळण लागले आहे. आम आदमी पार्टीच्या उमेदवारावर थेट बंदूक रोखण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. हा हल्ला जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या प्रकाश लोंढे यांच्या कार्यकर्त्याने केल्याचा आरोप आहे.

ताज्या बातम्या

पडसाद : .. अन् मनसे एका जागेवरच थांबली!

0
नाशिक महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आलेख गेल्या चौदा वर्षांत चाळीस जागांवरून अवघ्या एका जागेवर आला, ही पडझड केवळ एका पक्षाच्या पतनाची नव्हे तर राज...