Monday, June 24, 2024
Homeमहाराष्ट्रसप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये राज्यात पावसाचं प्रमाण कसं असेल? मान्सूनबाबत महत्त्वाची बातमी

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये राज्यात पावसाचं प्रमाण कसं असेल? मान्सूनबाबत महत्त्वाची बातमी

पुणे | Pune

- Advertisement -

गेल्या दोन आठवड्यात पावसाने दांडी मारल्यानंतर पुन्हा पावसाचा हलक्या सरी बरसायला सुरुवात झाली आहे. असाच पाऊस येणाऱ्या पाच ते सहा दिवस पडणार आहे. सप्टेंबर महिन्यात मॉन्सूनचा पाऊस (Monsoon Rain) आणि ऑक्टोबरपासून परतीचा पाऊस (Retreating) कसा राहील, याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागून राहिले आहेत. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत चांगला पाऊस पडू शकतो, असा हवामान विभागाचा (Rain Forecast) अंदाज आहे. त्यामुळे राज्यासाठी थोडीफार का होईना ही दिलासा देणारी बातमी आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आयओडी थोडा उशिरा सक्रिय झाला. त्यामुळेच ऑगस्ट महिन्यात पाऊस कमी पडला. पण आता हा आयओडी सक्रिय झाला आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडू शकतो. ऑक्टोबर महिन्यातही परतीचा पाऊस चांगला आधार देण्याची शक्यता आहे. मागील काही वर्षांमध्ये आपल्याकडे परतीचा पाऊस चांगला झालेला आहे.

Chandrayaan-3: चांद्रयान-3 चा पहिला शोध, पाठवली महत्वाची माहिती

पश्चिम महाराष्ट्र म्हणजे अहमदनगर, पुणे, पुणे जिल्हा, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या सहा जिल्ह्यात ३१ ऑगस्टपर्यंत अत्यल्प पाऊस म्हणजे ०५ ते १.५ मीमी पाऊस असणार आहे. तसेच, कोकण भागात जेसे की सिधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या पाच जिल्ह्यातील पावसाची स्तिथी अतिशय कमी असणार आहे. ०१ मिलिमीटर तर काही दिवशी १५ मिलिमीटर पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आवली आहे.

मराठवाडा विभागात जसे की धरावी, धाराशिव, हिंगवली बीड, औरंगाबाद, जालना, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये अल्पशा पावसाचं प्रमाण राहणार आहे. २ मिलिमीटर ते ४ मिलिमीटर पाऊस राहणार आहे. इतर सर्व जिल्ह्यात ०.१ ते १.३ मिलिमीटर पर्यंत पाऊस राहणार आहे. असा अंदाज हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे.

‘दिल्ली बनेगा…’; जी-२० परिषदे आधी दिल्लीच्या मेट्रो स्टेशनबाहेर खलिस्तान्यांच्या भारत विरोधी घोषणा

हवामान विभाग दर गुरुवारी पुढील चार आठवड्यांचा अंदाज देत असते. ताज्या अंदाजानुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस कमीच राहील. पण ८ सप्टेंबरनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि मराठवड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊ शकतो. ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये पाऊस चांगला राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या