मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात घाटमाथ्यावर (Maharashtra Rain Update) पावसाचा जोर वाढला असून, हवामान विभागाने पुढील काही (IMD Rain Alert) दिवसांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. यात आज (बुधवार) कोकण (Kokan) आणि घाट क्षेत्रासाठी ऑरेंज तर उत्तर महाराष्ट्राला यलो अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाने कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पश्चिम महाराष्ट्रातील (Maharashtra) सातारा, कोल्हापूर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यांच्या (Pune Rain) घाटमाथ्यावर अतिवृष्टीची नोंद झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, जळगाव आणि चंद्रपूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे प्रमाण कमी राहील. याठिकाणी काही जिल्ह्यांत तुरळक पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने (Rain) चांगलाच धुमाकूळ घातला होता. सर्वदूर झालेल्या या पावसाने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले होते. तसेच शेतीपिकांनाही मोठा फटका बसला होता. त्यानंतर जून महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने उघडीप दिली होती. साधारण १५ जूनपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होते. यावेळी मात्र मान्सून लवकर दाखल झाला होता. त्यामुळे पाऊस लवकर सुरू होईल, अशी अपेक्षा होती.




