Wednesday, June 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMarathwada Rain : पावसाचे थैमान, स्वप्नांचा चिखल; मराठवाड्यात शेती, गावे पाण्याखाली

Marathwada Rain : पावसाचे थैमान, स्वप्नांचा चिखल; मराठवाड्यात शेती, गावे पाण्याखाली

  • बळीराजाच्या डोळ्यांत पाणी
  • नागरिक सुरक्षितस्थळी
  • रविवारपर्यंत जोर राहणार

मुंबई | Mumbai

राज्यात सर्वदूर सुरू असलेल्या पावसाने (Rain) अक्षरशः थैमान घातले असून, विशेषतः मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना (Maharashtra District) ढगफुटीसदृश पावसाने झोडपून काढले आहे. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

- Advertisement -

नद्यांना (River) पूर, शेतात पाणी आणि घरांमध्ये शिरलेले पाणी पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रूच्या धारा लागल्या असून स्वप्नांचा चिखल झाला आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात बुधवारी (दि.२४) कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असून रविवार (दि. २८) पर्यंत तो राज्यात येण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे नाशिक, खान्देशामध्ये २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान ढगाळ हवामान आणि पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील (Solapur District) माढा तालुक्यातील बाकाव, तांदुळवाडी, राहुल नगर आणि दारफळ या गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. बार्शी तालुक्यात (Barshi Taluka) तर ढगफुटीच झाली असून,भोगावती, नगरी, नीलकंठ आणि चांदणी या नद्यांना आलेल्या महापुरामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. बार्शी-आगळगाव आणि बार्शी-तुळजापूर सत्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पंढरपूर येथील चंद्रभागा नदीही दुथडी भरून वाहत असून, वाळवंटातील अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. अक्कलकोटमध्येही ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने प्रचंड पाणी शेतीत घुसले आहे.

दुसरीकडे, धाराशिव जिल्ह्यातील (Dharashiv District) भूम आणि परंडा तालुक्यातही पावसाने हाहाकार माजवला आहे. परंडा येथील देवगावात चांदणी नदीचे पाणी कतीत शिरल्याने अनेकांना घरे सोडून बाहेर पडावे लागले. काही कुटुंबांना तर छतावर चढून जीव वाचवावा लागला. येथील २४ जणांना लष्कराने हेलिकॉप्टरच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले हेलिकॉप्टर आले नसते तर आम्ही वाचलो नसतो, असे येथील गावकन्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री शिर्देकडून आढावा

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाला तातडीने बचावकार्य पुरवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नागपूर, धाराशिव आणि सोलापूरमधील अडकलेल्या लोकांना तातडीने एअरलिफ्ट करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

ताज्या बातम्या

विधानपरिषद निवडणूक : अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांचा महायुतीचे उमेदवार नरेंद्र...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashikनाशिकमध्ये होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (िद.१०) मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी अखेर महायुतीचे...