पुणे | Pune
मुंबईसह (Mumbai) संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) सोमवार (दि.६) पासून परतीचा पाऊस बरसेल. दि. ६ ते ८ ऑक्टोबरदरम्यान राज्यभर ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Rain) पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, १२ ऑक्टोबरनंतर मान्सून महाराष्ट्रातून परत फिरणार आहे.
यंदा मान्सूनचा (Moon) प्रवास भारतात आणि महाराष्ट्रात (Maharashtra) लांबला आहे. ऑक्टोबर महिन्याची सुरुवात झाली असली तरी मान्सून वेळेत परतलेला नाही. नवरात्र आणि दसरा (Dasara) पावसात गेल्यामुळे आता दिवाळीचा सणदेखील पावसात जाणार का, अशी चिंता सर्वसामान्य नागरिकांना सतावत होती. या परिस्थितीत हवामान विभागाने हा अंदाज जारी केला आहे.
ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोसळणाऱ्या परतीच्या पावसाचा गुजरातमधून (Gujarat) प्रभाव मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दि. ६ ते ८ ऑक्टोबरदरम्यान पुन्हा जाणवेल. याचा स्पष्ट अर्थ असा की, सोमवार (दि.६) पासून राज्यात पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार आहे. या कालावधीत राज्यभरात ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, पुढील तीन दिवसांसाठी (४ ऑक्टोबरनंतर) पावसाला (Rain) पोषक वातावरण निर्माण झाले असून, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे. उर्वरित भागांमध्ये पावसाची उघडीप राहील.




