Monday, January 26, 2026
Homeमुख्य बातम्याMaharashtra Rain Update : राज्यातील 'या' भागांत विजांसह पावसाचा अंदाज; १० जिल्ह्यांना...

Maharashtra Rain Update : राज्यातील ‘या’ भागांत विजांसह पावसाचा अंदाज; १० जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत अवकाळी पावसाने (Rain) उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना (Farmer) पावसाळ्यापूर्वीच्या कामांना गती देण्यास संधी मिळाली आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर नागरिकांना उन्हाचा चटका आणि उकाड्याचा (Rain Update) सामना करावा लागत आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळीने राज्यभरात धुमाकूळ घातला होता. त्यानंतर पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. यानंतर आता पुन्हा एकदा हवामान विभागाने राज्यातील विविध भागांत पावसाचा अंदाज वर्तवविला आहे.

- Advertisement -

हवामान विभागाने (IMD) उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा यासह पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला असून, यलो अलर्ट जारी केला आहे. नंदूरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत विजासंह (District) वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

YouTube video player

तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर १० जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. याशिवाय कमाल तापमानामध्ये देखील चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पुढील ४८ तासांत जोरदार पावसाची शक्यता

देशातील अनेक भागात पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच पुढील दोन दिवसांत ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच पावसाची तीव्रता देखील कमी होऊ शकते, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

ताज्या बातम्या

77th Republic Day 2026 : दिल्लीत कर्तव्य पथावर 30 विविध चित्ररथ,...

0
नवी दिल्ली | New Delhi आज भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा (77th Republic Day) केला जात आहे. यानिमित्ताने दिल्लीतील कर्तव्यपथावर लष्करी दलांकडून संचलन केले...