Sunday, November 24, 2024
Homeमनोरंजन'महाराष्ट्र शाहीर' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई| Mumbai

बहुप्रतीक्षित महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir) या सांगीतिक पर्वणी ठरणाऱ्या बिग बजेट चित्रपटाचा ट्रेलरचे महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले..

- Advertisement -

यावेळी सामंत म्हणाले की, शाहीर साबळे हे महाराष्ट्र शाहीरच्या माध्यमातून पुढील पिढीपर्यंत पोहोचावेत यासाठी हा चित्रपट शाळाशाळांमध्ये दाखवला जाणार असून याची तजवीज शासन करेल, अशी घोषणाही त्यांनी केली. तसेच “मी संयुक्त महाराष्ट्र चळवळ पाहिलेली नाही, पण त्याबद्दल वाचले आहे. लोककलेतून आणि जनजागृतीतून काय आव्हान उभे करता येते ते शाहिरांनी त्यावेळी दाखवून दिले आहे. शाहीर साबळे कोण हे पुढील पिढीला कळावे म्हणून या चित्रपटाची निर्मिती झाल्याचे सामंत यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंच्या भेटीवर शरद पवारांचा खुलासा; म्हणाले, ‘मविआ’ म्हणून…

तर अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून तो म्हणाला की, तीन वर्षांच्या मेहनतीनंतर एक सर्वांगसुंदर असा चित्रपट तयार झाला आहे. “हा चित्रपट आपण आणि नव्या पिढीने आवर्जून पाहावा आणि आपण त्यांना तो दाखवावा, असा आहे. त्यातून पुढील पिढीला लोककला, लोकसंस्कृती कळेल, त्यावेळचे विचार, राष्ट्राभिमान, महाराष्ट्राभीमान, मराठीचा अभिमान काय असतो याची जाणीव होईल. यासोबतच दिग्दर्शक केदार शिंदे, आजचे शिखरावर असलेले संगीत दिग्दर्शक अजय-अतुल यांच्याबरोबर आम्हाला काम करता आले आणि त्यातून एक दर्जेदार चित्रपट निर्माण झाला, याचा अम्हाला अभिमान असल्याचे त्यांनी म्हटले.

अजित पवारांना ‘या’ प्रकरणात ईडीचा मोठा दिलासा

दरम्यान, महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट २८ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाची निर्मिती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट (Everest Entartainment) स्टुडीओ आणि बेला केदार शिंदे प्रॉडक्शन्सने केली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या