Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रLoksabha Election 2024 : राज्यात दुपारपर्यंत 'इतके' टक्के मतदान; नंदुरबारमध्ये सर्वाधिक तर...

Loksabha Election 2024 : राज्यात दुपारपर्यंत ‘इतके’ टक्के मतदान; नंदुरबारमध्ये सर्वाधिक तर पुण्यात सर्वात कमी

मुंबई | Mumbai

आज देशासह राज्यभरात चौथ्या टप्प्यातील (Fourth Phase) मतदान (Voting) पार पडत असून मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. चौथ्या टप्प्यामध्ये देशातील १० राज्यांमधील आणि केंद्रशासित प्रदेशातील ९६ मतदारसंघात मतदान पार पडत आहे. यात महाराष्ट्रातील (Maharashtra) नगर दक्षिण, शिर्डी, नंदुरबार, जळगांव, रावेर, पुणे, शिरूर, मावळ, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या ११ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

- Advertisement -

आज मतदान होत असलेल्या महाराष्ट्रातील या मतदारसंघांमधील दुपारी एक वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार जळगावमध्ये ३१.७०, जालना ३४.४२, नंदूरबार ३७.३३, शिरूर २६.६२, अहमदनगर २९.४५, छत्रपती संभाजीनगर ३२.३७, बीड ३३.६५, मावळ २७.१४, रावेर, ३२.०२, शिर्डी ३०.४९ आणि पुण्यात २६.४८ टक्के इतके मतदान झाले आहे. या आकडेवारीनुसार दुपारी एक वाजेपर्यंत महाराष्ट्रात ३०.८५ टक्के मतदान झाले असून सर्वाधिक ३७.३३ टक्के मतदान नंदुरबारमध्ये आणि सर्वात कमी २६.४८ टक्के मतदान पुण्यात झाले आहे.

दरम्यान, सकाळी नऊ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघात एकूण ६.१४ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर ११ वाजेपर्यंत या मतदानाची आकडेवारी १७.५१ टक्क्यांपर्यंत पोहचली होती. यानंतर दुपारी एक वाजेपर्यंत ही मतदानाची आकडेवारी वाढून ३०.८५ टक्के इतकी झाली. त्यामुळे आता मतदान संपेपर्यंत ही आकडेवारी किती टक्क्यांपर्यंत पोहचते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या