पुणे | Pune
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर तसेच कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा आज (मंगळवारी) दुपारी एक वाजता ऑनलाईन (Online) निकाल जाहीर होणार आहे. त्याआधी महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
त्यानुसार राज्याचा दहावीचा निकाल (SSC Result) ९४.१० टक्के इतका लागला असून, यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९६.१४ तर मुलांची ९२.२१ इतकी आहे. तसेच बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. कोकण विभागाचा ९८.८२ टक्के आणि नागपूर विभागाचा ९०.७८ टक्के निकाल लागला आहे.
दरम्यान, यंदा १५ लाख ४६ हजार ५७९ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा (SSC Exam) दिली होती. त्यापैकी १४ लाख ५५ हजार ४७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची टक्केवारी ९३.०४ टक्के आहे. फ्रेश विद्यार्थ्यांचा निकाल ९४.१० टक्के आहे. तर सर्व विद्यार्थ्यांचा (खासगी, दिव्यांग, फ्रेश, पुनरपरीक्षार्थी) निकाल ९३.०४ टक्के आहे. तसेच यंदा २८ हजार १२ खासगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २२ हजार ५१८ विद्यार्थी (Student) उत्तीर्ण झाले आहेत. तसेच ९ हजार ६७३ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९ हजार ५८५ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यातील ८ हजार ८४८ उत्तीर्ण झाले आहेत.यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.२७ टक्के इतकी आहे.
विभागनिहाय १०० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या
पुणे – १०, नागपूर – ०१, छत्रपती संभाजीनगर – ३२, मुंबई -०८, कोल्हापूर – ०३, अमरावती – ०७, नाशिक -० लातूर -११३ आणि कोकण – ०३
निकालाची विभागनिहाय टक्केवारी
पुणे : ९४.८१ टक्के
नागपूर : ९०.७८ टक्के
संभाजीनगर : ९२.८२ टक्के
मुंबई : ९५.८४ टक्के
कोल्हापूर : ९६.७८ टक्के
अमरावती : ९२.९५ टक्के
नाशिक : ९३.०४ टक्के
लातूर : ९२.७७ टक्के
कोकण : ९९.८२ टक्के
विद्यार्थ्यांना या अधिकृत संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार
1.https://results.digilocker.gov.in
2. https://sscresult.mahahsscboard.in
3.http://sscresult.mkcl.org
4. https://results.targetpublications.org
5. https://results.navneet.com
6.https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams
7.https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results
8.https://www.indiatoday.in/education-today/results
9. https://www.aajtak.in/education/board-exam-results