मुंबई | Mumbai
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहेत. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ ते १९ मार्च २०२४ होणार आहे. तर तर १ मार्च ते २६ मार्च २०२४ दरम्यान होणर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना लवकरच परीक्षेची तयारी करावी लागणार आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) परीक्षेची लेखी परीक्षा कोणत्या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत, याची माहिती महाराष्ट्र शिक्षण मंडळाने दिली आहे.
आरक्षणाच्या नावाने केवळ पोकळ बैठकांचे सत्र चालू ; छत्रपती संभाजीराजेंचा सर्वपक्षीच बैठकीवर बहिष्कार
‘मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी असणार आहे. मात्र, परीक्षेपूर्वी सर्व माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल, असे शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे.
इयत्ता १० वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शनिवार दिनांक १० फेब्रुवारी, २०२४ ते गुरूवार दिनांक २९ फेब्रुवारी, २०२४ व इयत्ता १२ वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शुक्रवार दिनांक २ फेब्रुवारी, २०२४ ते मंगळवार दिनांक २० फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.