Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजLocal Body Election 2025: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आली महत्वाची अपडेट; राज्य...

Local Body Election 2025: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आली महत्वाची अपडेट; राज्य निवडणुक आयोगाच्या सरकारला महत्वाच्या सुचना

मुंबई | Mumbai
राज्यातील रखडलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची प्रतीक्षा अखेर संपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्यात लवकरच निवडणुकीचा धुराळा उडणार असल्याचे संकेत आता मिळू लागले आहे. राज्य निवडणुक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आनुषंगाने तयारीला सुरवात देखील केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या चार आठवड्यांत अधिसूचना जारी करण्याच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या असून, निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग रचनेसंबंधीत सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लकवरच स्थानिक स्वराज्य संस्थांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मागील महिन्यात स्पष्ट आदेश देत, राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची ४ महिन्यांच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी आणि त्याआधी चार आठवड्यांत अधिसूचना जाहीर करावी, असे निर्देश दिले होते. त्यानुसार निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्यासाठीच्या हालचालींना वेग आणला आहे.

- Advertisement -

निवडणूक आयोगाने प्रभाग रचना पूर्ण करण्याची जबाबदारी राज्य सरकारवर सोपवली आहे. प्रभाग रचनेची माहिती राज्य सरकारने निवडणूक आयोगाला दिल्यानंतर आरक्षण आणि मतदार याद्या अंतिम करण्याची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची महत्वाची माहिती समोर आली आहे. प्रभाग रचनेची प्राथमिक प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात असून, याच आठवड्यात ती माहिती आयोगाकडे सादर होण्याची शक्यता आहे.

YouTube video player

निवडणुका कधी लागणार?
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला निवडणूक प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्याची मुभा दिली आहे. सध्याच्या परिस्थितीत ही संपूर्ण प्रक्रिया सप्टेंबरच्या आत पूर्ण करणे कठीण असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे आयोग ऑक्टोबरमध्ये निवडणुका घेण्यासाठी न्यायालयाकडे मुदतवाढीचा प्रस्ताव सादर करू शकतो.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Politics : नाशकात मोठी राजकीय घडामोड; दोन माजी महापौर करणार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) धामधुमीत शहरात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी भाजपमध्ये (BJP) असलेले नाशिकचे दोन माजी...