Tuesday, December 10, 2024
Homeनगरमहाटीईटी परिक्षा : अर्ज करण्यास मुदतवाढ

महाटीईटी परिक्षा : अर्ज करण्यास मुदतवाढ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (Maharashtra Teacher Eligibility Test) 10 ऑक्टोबरला होणार आहे. या पार्श्वभूमीवर 25 ऑगस्टअखेर अर्ज करण्यास मुदत देण्यात आली होती. पण आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (Maharashtra Teacher Eligibility Test) 5 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे इच्छुक व ज्याचे अर्ज भरण्याचे राहिले होते त्यांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test) म्हणजेच टीईटी परीक्षा (TET Exam) बर्‍याच कालावधी नंतर घेण्यात येत आहे. करोना विषाणू संसर्गाच्या (Covid 19 Problem) कारणामुळे ही परीक्षा लांबणीवर पडली होती. टीईटी परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया (Registration process for TET exam) 3 ऑगस्टपासून सुरू होत आहे.

इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यमे, अनुदानित तसेच विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांनी या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या