Saturday, May 4, 2024
Homeक्रीडा१९ वर्षाखालील महाराष्ट्र टेबल टेनिस महिला संघाला सूवर्णपदक; नाशिकच्या खेळाडू विजयाच्या शिल्पकार

१९ वर्षाखालील महाराष्ट्र टेबल टेनिस महिला संघाला सूवर्णपदक; नाशिकच्या खेळाडू विजयाच्या शिल्पकार

नाशिक | Nashik

चेन्नई (Chennai) येथे सुरु असलेल्या यूटिटी ८४व्या  जूनियर व युथ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या १९ वर्षाखालील मुलींच्या संघाने हरियाणा (Haryana) संघाचा ३-१ असा पराभव करून सुवर्ण पदक पटकावाले…

- Advertisement -

अंतिम फेरीत पहिल्या सामन्यात हरियाणाच्या सुहाना सैनीने महाराष्ट्राच्या जेनिफर वर्गीसचा ३-० असा पराभव करून १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सामन्यात तनिशा कोटेचाने हरियाणाच्या प्रोतिका चक्रवर्ती हिचा ३-० पराभव करून फेरी जिंकत सामन्यात १-१ अशी बरोबरी केली.

उत्कृष्ट फोरहँड व बैकहँड फटक्यांचा वापर करत तीने प्रोतिकाला सुरवातीपासूनच वरचढ होऊ दिले नाही.  तिसऱ्या गेम मधे सायली वाणी ने आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर हरियाणाच्या काव्या यादव हिचा ३-० असा सहज पराभव करून संघाला सामन्यात २-१ अशी आघाडी मिळवून दिली.

चौथ्या सामन्यात तनिशाची गाठ पडली ती सुहाना सैनी सोबत, या वर्षीच्या मोसमात राष्ट्रीय मानांकन स्पर्धेत प्रथम मानांकित सुहाना सैनी (Suhana Saini) हिने तनिशाला पराभूत केले असल्यामुळे तनिशावर थोडा दबाव होता.  सुहाना ने पहीला गेम जिंकून १-० अशी आघाडी घेतली. पुढील दोन गेम तनिशाने जिंकून २-१ आघाडी घेतली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

IND VS AUS 1st Test : भारताचा ऑस्ट्रेलियावर ‘इतक्या’ धावांनी विजय

चौथ्या गेम सुरवातीपासून ८-३ अशी आघाडी तनिशाने घेतली असल्याने हा सामना सहजरीत्या जिंकणार असे वाटत असतांना हरियाणाच्या सुहाना सैनी हिने संयम राखत बरोबरी करून गेम स्कोर १०-१० असा करून पुढील दोन गुण घेत १३-११ असा गेम जिंकला, २-२ बरोबरी करून तीने सामन्यात रंगत आणली आणि सामना पाचव्या गेम पर्यंत नेला.

परंतु शेवटच्या गेम मधे तानिशाने सुरवातीपासून सुहानाला डोके वर काढू न देता  ११-४ असा जिंकला. महाराष्ट्र संघाची कर्णधार असलेल्या नाशिकच्या (Nashik) तनिशा कोटेचा (Tanisha kotecha) हिने दोन गेम्स व सायली वाणी (sayali wani) ने एक गेम जिंकून महाराष्ट्राला मुलींच्या संघाने सुवर्ण पदक (Gold medal) मिळवून दिले. तानिशा व सायलीने हे विजेतेपद महाराष्ट्राला जिंकून दिल्याबद्दल त्यांचे प्रशिक्षक जय मोडक यांनी समाधान व्यक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या