Saturday, July 27, 2024
Homeनगरनगरचे व्यापारी म्हणतात, बाजारपेठेत समाधानाची झुळूक!

नगरचे व्यापारी म्हणतात, बाजारपेठेत समाधानाची झुळूक!

अहमदनगर | Ahmednagar

राज्य शासनाने (State gov) बाजारपेठांसाठी निर्बंध (Restrictions for markets) शिथील केल्यानंतर नगरमधील (Ahmednagar) व्यापारक्षेत्रात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. 15 ऑगस्टपासून (August 15) सर्व व्यापारी अस्थापने आणि हॉटेल्स (Hotels reopen) काही माफक अटींसह रात्री 10 पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे नगरच्या बाजाराचा (Ahmednagar market) श्वास मोकळा होणार आहे. याबाबत सकारात्मक प्रतिक्रीया व्यावसायिकांतून उमटल्या.

- Advertisement -

राज्यात अनेक भागांत दुकांनांची वेळ वाढवून देण्यात आली होती. मात्र नगरमध्ये निर्बंध कायम होते. मात्र काल शासनाने राज्यात सर्वत्र दुकाने, हॉटेल्स, मॉल्सवरील वेळेचे निर्बंध हटवून रात्री 10 वाजेपर्यंत बाजारपेठ खुली ठेवण्यास मुभा दिली. त्यासाठी काही अटीही सरकारने ठेवल्या आहेत. मात्र त्यांची पूर्तता करणे, शक्य असल्याने मोठा अडसर होणार नाही. (ahmednagar unlock news)

या निर्णयानंतर शहरातील व्यापार्‍यांशी संवाद साधला. त्यात व्यापार्‍यांनी समाधान आणि उत्साह दाखविला. तीन-चार वर्षापासून व्यापारी वर्ग अनेक अडचणींना सामोरे जात आहे. त्यात करोनाने (Covid19) सामान्य जनतेसह व्यापार्‍यांचीही तीव्र अडचण केली. राज्य शासनाने काही अटीशर्थींसह दुकानांच्या वेळा वाढवून दिल्या याबद्दल समाधानी आहोत, अशी प्रतिक्रीया महात्मा गांधी रोड व्यापारी संघटनेचे शामराव देडगावकर, किरण व्होरा, पेमराज पोखरणा यांनी दिली. नोटबंद, जीएसटी, दुष्काळ व करोना अशी संकटे एकापाठोपाठ आली. त्याचा विपरीत परिणाम बाजारपेठेवर झाला. अनेक व्यावसायिकांवर करोनाकाळात व्यवसायच नसल्याने काही कर्मचारीही कमी करण्याची वेळ आली, असेही त्यांनी सांगीतले.

Corona Update : जिल्ह्यात आज आठशेहून अधिक रुग्णांची नोंद, संगमनेर शंभरी पार

व्यापार्‍यांचे 100 टक्के लसीकरण (corona vaccination of traders)

नगरच्या कापड बाजारातील (Textile market) व्यावसायिकांचे 100 टक्के लसीकरण झाले आहे. दुकानात काम करणार्‍या कर्मचारी वर्गाचेही 95 टक्के लसीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे रविवारपासून पूर्ण क्षमतेने बाजारपेठ सुरू होईल असा विश्वास असल्याचे कापड व्यावसायिक किरण व्होरा यांनी सांगीतले.

करोनात कापड महागले

करोना काळात अन्य जीवनाश्यक वस्तूंप्रमाणेच कापडाच्या दरातही महागाई उसळली आहे. कापडाचे सुमारे 30 ते 50 टक्के दर महागले आहेत. याचाही ग्राहक आणि पर्यायाने व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे, अशी माहिती एका व्यावसायिकाने दिली.

शेतकरी (Farmers) नगरकडे वळतील

शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील दूरावलेले शेतकरी माल विक्रीसाठी पुन्हा नगरकडे पूर्ण क्षमतेने वळतील, असा विश्वास आडते व्यापारी संघटनेचे सचिव संतोष बोरा यांनी व्यक्त केला. शहराची बाजारपेठ ही संपूर्णपणे ग्रामीण भागातील शेतकर्‍यांवर अवलंबून आहे. दुपारी 4 पर्यंतची वेळ मर्यादा अनेक अडचणी निर्माण करणारी होती. त्यामुळे ग्रामीण भागातील अवघे 25 टक्के शेतकरीच नगरकडे वळत होते. त्यामुळे व्यापारावर परिणाम झाला होता. नव्या नियमानुसार बाजाराची वेळ वाढल्याने पुन्हा सर्व सुरळीत होईल, असे ते म्हणाले.

शनिवार-रविवारच्या फेर्‍यातून सुटका

शनिवार-रविवारच्या लॉकडाऊनमधून (weekend lockdown) सुटका ही मोठी दिलासादायक बातमी आहे. नगरमधील निर्बंधांमुळे जिल्ह्यातील शेतकरी शेजारच्या जिल्ह्यात मालविक्रीसाठी जात होते. याचा परिणाम बाजार समितीवरही झाला होता. शेतकरी आणि व्यापारी असे दोघांसाठी हे नुकसानदायक होते. आता यातून सुटका होण्याची अपेक्षा आहे, असे बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोथरा यांनी सांगीतले. मार्केट यार्डत (Market Yard) सध्या शेतकर्‍यांकडून मूगाची आवक सुरू झाली आहे. लवकरच सोयाबीन विक्री यईल. व्यापाराची वेळ वाढल्याने उलाढालीचा मदत होईल, असे ते म्हणाले.

वाचलेला खर्च सोन्यात गुंतवला

करोना काळात सराफा बाजारातील हालचाल चांगली होती. लग्न समारंभांवर मर्यादा असल्याने अनेक वधू-वर पालकांचा मोठा खर्च वाचला. त्यांनी हा वाचलेला पैसा सोन-चांदी दागिन्यात गुंतवला. त्यामुळे सराफा बाजारात चांगली उलाढाल झाली. आता खरेदीसाठी वेळ वाढवून मिळाल्याने ग्राहकांना फायदा होणार आहे, असे सोनेचांदीचे व्यापारी प्रमोद बुर्‍हाडे यांनी सांगीतले. सराफा व्यापारी करोना निर्बंधातील अटींचे पालक करूनच व्यवसात करत होते. 15 ऑगस्टपासून मिळालेल्या शिथीलतेतही प्रशासनास सहकार्य राहील, असे ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या