Tuesday, March 25, 2025
HomeराजकीयAditya Thackeray Worli Vidhan Sabha: आदित्य ठाकरेंना हरवण्यासाठी CM शिंदेंचा 'मास्टर प्लान';...

Aditya Thackeray Worli Vidhan Sabha: आदित्य ठाकरेंना हरवण्यासाठी CM शिंदेंचा ‘मास्टर प्लान’; वरळीतून राज्यसभा खासदाराला मैदानात उतरवणार?

मुंबई । Mumbai

वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवेसना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. २०१९ साली त्यांनी जेव्हा पहिल्यांदा निवडणूक लढविली होती, तेव्हा मनसेने त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. तसेच शिवसेना-भाजपाची युती असल्यामुळे आदित्य ठाकरेंसाठी ती निवडणूक सोपी राहिली.

- Advertisement -

मात्र यावेळी मनसेकडून संदीप देशपांडे यांना वरळीतून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंसमोरील आव्हान कडवं असणार हे स्पष्ट झालं आहे. असं असतानाच आता या दुहेरी लढाईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आपल्या पक्षाचा उमेदवार उतरवण्यासाठी जोरदार तयारी करत असून त्यांनी आपला हुकुमी एक्का इथे वापरण्याची चाचपणी सुरु केली आहे. खरोखरच असं झालं तर ही लढाई ठाकरेंसाठी फारच कठीण ठरेल असा प्रथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. शिंदेंचा हा हुकुमी एक्का आहे तरी कोण आणि त्यांचा काय प्लॅन जाणून घेऊयात.

आदित्य ठाकरे यांच्याविरोधात वरळी विधानसभेत शिवसेनेकडून राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांना तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे. मिलिंद देवरा सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. मात्र त्यांना आमदारकी लढण्यासाठी उतरवले जाण्याची चिन्हं आहेत. महत्त्वाचं म्हणजे मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघाचेही माजी खासदार आहेत. त्यामुळे जर मिलिंद देवरा यांना शिंदे यांच्या शिवसेनेने मैदानात उतरवलं तर आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

कोण आहेत मिलिंद देवरा?

मिलिंद देवरा हे मूळचे कॉंग्रेसचे आहे. अनेक वर्ष कॉंग्रेसमध्ये राहिल्यानंतर आता त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. मिलिंद देवरा यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश झाल्यानंतर त्यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली आहे. यापूर्वी मिलिंद देवरांनी दक्षिण मुंबई मधून ३ वेळेस लोकसभेचे खासदार म्हणून पद भूषवलं आहे. अवघ्या २७ व्या वर्षी ते खासदार झाले होते. उच्च शिक्षित आणि सुसंकृत चेहरा म्हणून मिलिंद देवरा यांच्याकडे सध्या पाहिलं जात आहे. कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद त्यांनी यापूर्वी भूषवलं आहे. देवरा यांच्याकडे लोकसभा निवडणुकीच्या वेळी वरळी मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आमदार आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असूनही, वरळी विधानसभेत ठाकरेंकडे केवळ ६५०० मतांची आघाडी होती.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...