Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजGanesh Visarjan : बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाची हजेरी; मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस, 'या'...

Ganesh Visarjan : बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाची हजेरी; मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस, ‘या’ जिल्ह्यांना IMD चा अलर्ट

मुंबई | Mumbai

दहा दिवस लाडक्या गणपती बाप्पाची (Ganpati Bappa) सेवा केल्यानंतर आज त्याला अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप दिला जात आहे. त्यामुळे लाखो गणेश भक्त (Ganesh Bhakt) आपल्या लाडक्या बाप्पााच्या विसर्जनासाठी सज्ज असल्याचे बघायला मिळत आहेत. दुसरीकडे गणपती बाप्पााच्या निरोप मिरवणुकीला पावसाने (Rain) देखील जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. कालपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असून, आजही हवामान विभागाने मुंबईला पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.

- Advertisement -

हवामान विभागाने (Meteorological Department) मुंबई ठाण्यासह पुणे घाटमाथ्यावरही पावसाचे अलर्ट दिले आहेत. यात उत्तर महाराष्ट्राकडे पावसाचा जोर आज अधिक राहणार असून, पालघर, नाशिक घाटमाथ्यासह धुळे ,नंदुरबार जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच आज पहाटेपासूनच मुंबईत (Mumbai) पावसाची रिपरिप सुरु असून, बाप्पााला निरोप देण्यासाठी स्वत: वरुणराजा आला असल्याचे दृश्य मुंबईत पाहायला मिळत आहे.

YouTube video player

हवामान विभागाच्या अंदाजानुसार सध्या कमी दाबाचा पट्टा मध्यप्रदेश व पूर्व राजस्थान भागाकडे सक्रिय झाला आहे . चक्राकार वाऱ्यांची स्थिती अरबी समुद्राच्या ईशान्य भागाला जोडून गुजरात किनारपट्टी भागात सक्रीय असून या भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र कोकण व गोवा (Maharashtra and Goa) भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ठाणे, मुंबई, पालघर, रायगडला मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागाने ,ठाणे, पालघर, मुंबई, रायगडमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यादरम्यान, सोसाट्याचा वारा वाहणार असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे. तसेच पालघर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट तर मुंबई, ठाणे, पुणे, रायगड या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान

गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात झालेला मुसळधार पावसामुळे २९ जिल्ह्यांमधील १४.४४ लाख हेक्टर जमीनवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल (शुक्रवारी) दिली . १५ ते २० ऑगस्ट दरम्यान झालेल्या जोरदार पावसामुळे १९१ तालुक्यांना अतिवृष्टीचा फटका बसला असून, यात ६५४ महसूल मंडळांमध्ये खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर १२ जिल्ह्यांमध्ये दहा हजार हेक्टर पेक्षा अधिक जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले .

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...