Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रRain Alert : घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील 'या' भागांत पाऊस बरसणार

Rain Alert : घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील ‘या’ भागांत पाऊस बरसणार

मुंबई | Mumbai

आज शारदीय नवरात्रोत्सवाला (Navratri 2023) सुरुवात होत असून घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यासह देशभरात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. आज आणि उद्या महाराष्ट्रासह देशात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यात हवामान खात्याने वर्तवली आहे.

- Advertisement -

हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण कोकण, उत्तर महाराष्ट्रात विजेच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. मात्र या पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसू शकतो. कारण अनेक पिके आता काढणीला आली आहेत. या पावसामुळे पिकांचं नुकसान होऊ शकतं. कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पावसाच्या सरी बरसू शकतात. तर उत्तर महाराष्ट्रात नंदूरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

देशातील गुजरात, राजस्थानसह उत्तर प्रदेशातून मान्सूनने माघार घेतली आहे. उत्तर प्रदेशात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर या भागात काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशासह, उत्तराखंडमध्येही पहाटे गुलाबी थंडी पडताना दिसत आहे. आज आणि उद्या हिमाचल प्रदेशातील कुल्लू, मंढी आणि शिमला भागात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या