Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Weather Update : राज्यात मान्सूनची गती मंदावली; कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले...

Maharashtra Weather Update : राज्यात मान्सूनची गती मंदावली; कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले ‘हे’ आवाहन

मुंबई | Mumbai

राज्यात यंदा मान्सून (Monsoon) १२ दिवस आधीच दाखल झाला आहे. सर्वसाधारण मान्सून महाराष्ट्रात (Maharashtra) सात जून रोजी प्रवेश करतो, मात्र यंदा २५ मे रोजीच त्याचे आगमन झाले आहे. या मान्सूनने महाराष्ट्राचा काही भाग व्यापला आहे. परंतु, आता राज्यात पावसाची (Rain) गती मंदावली असून, पुढील १२ जूनपर्यंत पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

- Advertisement -

हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, सध्या मान्सूनचे प्रवाह कमकुवत झाले आहे. त्यामुळे राज्यात पावसाचे प्रमाण कमी होणार आहे. तसेच बहुतांश भागात कोरडे हवामान अपेक्षित असून, कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे विदर्भात ४० अंशापर्यंत तर मराठवाडा व खानदेशात ३५ ते ४० अंशामध्ये कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे. या कोरड्या हवामानाचा (Weather) परिणाम पेरणी आणि लागवडीवर पडण्याची शक्यता आहे.

YouTube video player

तर दुसरीकडे कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात (Uttar Maharashtra) तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवविला आहे. याशिवाय विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून, काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन देखील कृषी विभागाकडून (Department of Agriculture) करण्यात आले आहे.

पेरणीची घाई नको

कृषी विभागाने शेतकऱ्यांना (Farmer) सध्या पेरणीची घाई न करण्याचा सल्ला दिला आहे. कारण पुढील काही दिवसांत मान्सूनची प्रगती संथ राहण्याची शक्यता आहे. मात्र, १२ जूननंतर पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान विभागाच्या सरकारी दप्तरात मान्सून हंगामाचा पाऊस एक जून पासून नोंदवण्यास सुरुवात होते. १ जूनपासून ३० सप्टेंबरपर्यंत पडलेला पाऊस मान्सूनचा पाऊस म्हणून नोंदवला जातो.

ताज्या बातम्या

Accident News : दुचाकी अपघातात आरोग्य सेवकाचा मृत्यू

0
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner रांजणगाव रोड (Ranjangaon Road) उपकेंद्र येथे आरोग्य सेवक (Health Worker) म्हणून कार्यरत असलेले राम गुणवंतराव जाधव (वय 29) यांचा मंगळवारी (दि.6)...